News Flash

Video: …जेव्हा अर्जुन बहिणी आणि काकूंच्यामध्ये फसतो

सध्या सोनमच्या लग्नाच्या तयारीत कपूर कुटूंब व्यग्र झालं असून दररोज तिच्या लग्नासंबंधित फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होत आहेत

अर्जुन कपूर

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वीच सोनमच्या लग्नाबद्दल होणाऱ्या चर्चा या अफवा नसून त्यात तथ्य असल्याचे कुटुंबियांनी सांगितले. सध्या तिच्या लग्नाच्या तयारीत संपूर्ण कपूर कुटूंब व्यग्र झालं असून दररोज तिच्या लग्नासंबंधित फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होत आहेत. यात आता अर्जुन कपूरच्या व्हिडिओचीही भर पडली आहे. या व्हिडिओमध्ये अर्जुन सोनमला त्रास देताना दिसत आहे.

अर्जुनच्या इन्स्टाग्रामवरील फॅनपेजवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात अर्जुन दरवाजाकडे उभा आहे आणि रुमच्या आत त्याच्या बहिणी मजा- मस्ती करताना दिसत आहेत. यात अंशुला कपूर, रिया कपूर, माहीप कपूर आणि सोनम कपूर दिसत आहेत. व्हिडिओमध्ये अर्जुन बोलतो की, ‘मी ‘वीरे दी वेडिंग’ लाइव्ह होताना पाहतोय असंच मला वाटतंय. तुझं लग्न खरंच होतंय अजून किती कौतुक हवंय तुला…’

बॉलिवूडच्या या बहुचर्चित लग्नसोहळ्याचा ई- वेडिंग कार्ड सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या ई- वेडिंग कार्डवरून विवाहस्थळ आणि विविध कार्यक्रमांची माहिती मिळत आहे. ७ मे रोजी मुंबईतल्या बीकेसी इथल्या सनटेक सिग्नेचर आयलँड येथे मेहंदीचा कार्यक्रम पार पडणार आहे. तर ८ मे रोजी सकाळी ११ वाजता बँड्रा बँडस्टँडजवळील रॉकडेल इथं लग्नसोहळा पार पडणार आहे. त्याच दिवशी रात्री ८ नंतर ‘द लीला’ या हॉटेलमध्ये लग्नाची पार्टी आयोजित करण्यात आली आहे.

अशाप्रकारे तीन वेगवेगळ्या ठिकाणी हा विवाहसोहळा संपन्न होणार असून बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांची त्याला उपस्थिती असेल यात काही शंका नाही. ‘शाह एक्सपोर्ट’ या देशातल्या सर्वांत मोठ्या निर्यात कंपनीचा व्यवस्थापकीय संस्थापक आनंद अहुजाशी सोनम ८ मे रोजी विवाहबद्ध होणार आहे. २०१४ मध्ये या दोघांची भेट झाली होती आणि पहिल्या भेटीनंतर महिनाभरातच आनंदने सोनमला प्रपोज केलं होतं. त्यानंतर बऱ्याच कार्यक्रमांमध्ये या दोघांना एकत्र पाहिलं गेलं. विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या लग्नानंतर बॉलिवूडमध्ये सोनमच्याच लग्नाची जोरदार चर्चा होती. अखेर तो मुहूर्त ठरला आहे आणि ८ मे या दिवसाची सर्वांनाच उत्सुकता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 12:44 pm

Web Title: arjun kapoor visits bride to be sonam kapoor their video captures the wedding preparation
Next Stories
1 राजकुमार रावच्या ‘ओमर्ता’ चित्रपटातील नग्न दृश्यांवर सेन्सॉरची कात्री
2 प्रभासच्या ‘साहो’ चित्रपटाच्या सेटवरील फोटो पाहिले का?
3 नोव्हेंबरमध्ये अडकणार दीपिका-रणवीर विवाहबंधनात?
Just Now!
X