News Flash

VIDEO: अर्जुन रामपालने सांगितला ‘डॅडी’ला भेटण्याचा अनुभव

इंग्रजीमध्ये लिहिलेल्या सिनेमाच्या करारावर स्वाक्षरी करतेवेळी नेमकी काय झाले

कुख्यात गुंड अरुण गवळीची भूमिका साकारणार अभिनेता अर्जुन रामपाल

अर्जुन रामपाल खूप दिवसांनी सिनेमामध्ये दिसणार आहे. आता एवढ्या दिवसांनी त्याचा सिनेमा येणार म्हटल्यावर त्या सिनेमाची कथाही तशी दमदारच हवी ना… मुंबईचा कुख्यात गुंड अरुण गवळी याच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘डॅडी’ या सिनेमातून अर्जुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अरुण गवळी याच्यावर सिनेमा होणार तर तो कसा असेल याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.

‘टॉयलेट- एक प्रेम कथा’साठी अक्षय- रणवीरने केला ‘चीप डान्स’

या सिनेमाचा ट्रेलर आणि गाणी प्रदर्शित होत असताना आता अजून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये अर्जुनने अरुण गवळीला पहिल्यांदा भेटण्याचा अनुभव शेअर केला आहे. अर्जुनने कशाप्रकारे सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली, गवळीला भेटायला गेला असता त्याने कशाप्रकारे स्वागत केले तसेच इंग्रजीमध्ये लिहिलेल्या सिनेमाच्या करारावर स्वाक्षरी करतेवेळी नेमकी काय झाले हे सगळं त्याने या व्हिडिओमध्ये सांगितले आहे.

काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. अर्जुन रामपालचा ‘डॅडी’ बनण्यापर्यंतचा प्रवास इतकाही सोपा नव्हता हे या सिनेमाचा ट्रेलर पाहताना लक्षात येते. ‘डॅडी’ या सिनेमाची कथा अरुण गवळी आणि दाऊद इब्राहिमच्या अवतीभोवती फिरताना दिसेल. या सिनेमात अनेक मराठी कलाकारांचे चेहरेही दिसत आहेत. आनंद इंगळे याने बाबूची भूमिका साकारली आहे तर राजेश श्रृंगारपुरे याने रामाची व्यक्तिरेखा वठवली आहे. निशिकांत कामत याने पोलीस अधिकाऱ्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. दिग्दर्शक अशीम अहलुवालिया यानेच या सिनेमाचे सह-लेखनही केले आहे. ८ सप्टेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार असून गवळीच्या बायकोची भूमिका ऐश्वर्या राजेश हिने साकारली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2017 9:39 pm

Web Title: arjun rampals first meeting with mumbai don arun gawali daddy
Next Stories
1 VIDEO : स्टंट करताना थोडक्यात बचावला टॉम क्रूझ
2 केबीसीमध्ये महिला क्रिकेट संघाने जिंकली तब्बल एवढी रक्कम
3 टीव्ही प्रेक्षक नसलेल्यांचाही मालिकेविरोधातील याचिकेला पाठिंबा आश्चर्यकारक- ‘पहरेदार पिया की’चे निर्माते
Just Now!
X