अभिनेता अर्शद वारसीचं ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याची माहिती त्याने स्वत: दिली आहे. माझ्या नकळत ट्विटर अकाऊंटवरून काही मेसेज पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे माझं ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचा अंदाज आहे, अशी माहिती त्याने दिली.

यासंदर्भात अर्शदने मंगळवारी सकाळी ट्विट केलं. ‘माझ्या नकळत माझ्या अकाऊंटवरून काही मेसेज इतरांना पाठवण्यात आले आहेत. मी अकाऊंटचा पासवर्डसुद्धा बदलला आहे. मला आशा आहे की लवकरच माझं ट्विटर अकाऊंट पूर्ववत होईल,’ असंही त्याने पुढे सांगितलं.

वाचा : सायबर क्राइमविषयी पर्ण पेठे म्हणतेय..

याआधीही अनुपम खेर, अभिषेक बच्चन यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले होते. तुर्किश आर्मी ग्रुपने हे अकाऊंट हॅक केल्याची माहिती अनुपम खेर यांनी दिली होती. पण अर्शदचं अकाऊंट कोणी हॅक केलं याची अद्याप माहिती समोर आली नाही.