मराठी नाटय़वर्तुळात नवे विषय आणि नवे प्रयोग सातत्याने होत आहेत. असाच नवा प्रयोग असलेलं खुसखुशीत नवं नाटक रसिकांच्या भेटीला आलंय. या नाटकाचं नाव आहे ‘चल तुझी सीट पक्की.’ ‘नाटक मंडळी’ प्रस्तुत या नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन नितीन दीक्षित यांनी केलं असून नाटकात अभिनेत्री लीना भागवत, मंगेश कदम आणि शरद पोंक्षे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

‘चल तुझी सीट पक्की’ या नाटकाचा आणि कलाकारांच्या भूमिकांविषयी अभिनेत्री लीना भागवत म्हणाल्या, ‘‘हे नाटक नवरा-बायकोच्या नात्यावर एका वेगळ्या अंगाने प्रकाश टाकणारं आहे. विभक्त झालेल्या कुटुंबात नवरा-बायको दोन मुलं अशी चारजणं असली तरी त्यांच्या नात्यात आता दुरावा आलेला दिसतो. नातं विस्कळीत होत चाललंय. अशा परिस्थितीत एक काहीतरी घटना घडते, तेव्हा ते चौघेजण एकत्र येतात की आणखीनच दूर जातात. काय होतं नेमकं..ते सांगणारं हे नाटक आहे. नाटकाचा विषय गंभीर असला तरी तो खूपच हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्यात आला आहे.’’

mohan bhagwat Swargandharva Sudhir Phadke
“हा चित्रपट पाहून बाबूजींचा…”, मोहन भागवत यांची ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ सिनेमा पाहिल्यावर प्रतिक्रिया
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
savita prabhune on caste Discrimination in industry
“तुम्ही विशिष्ट आडनावाचे…”, भेदभावाबद्दल सविता प्रभुणे यांचं स्पष्ट मत; म्हणाल्या, “मला उलट या इंडस्ट्रीचा…”
kirit somaiya
“…म्हणून काही तडजोडी केल्या”, किरीट सोमय्यांचं वक्तव्य चर्चेत; म्हणाले, “आता मविआ सरकार असतं तर…”

आपल्या भूमिकेविषयी त्यांनी सांगितलं, ‘‘उमा वसंत इनामदार ही व्यक्तिरेखा नाटकात साकारली आहे. ही भूमिका जास्त आवडली कारण वेशभूषेपासून ते रंगभूषेपर्यंत सगळ्याच बाबतीत वेगळेपण आहे. मी आतापर्यंत कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणाऱ्या आईच्या, काकूच्या भूमिका केल्या, त्यापेक्षा ही वेगळी भूमिका आहे. मी आणि मंगेश नाटकात मुख्य भूमिकेत आहोत. आमच्याबरोबर शरद पोंक्षेसुद्धा या नाटकात आहेत. त्यांच्याबरोबर मी चित्रपट आणि मालिकांमधून काम केलं आहे. नाटकातल्या चौकोनी कुटुंबात वेगळा प्रवाह आणणारी भूमिका ते करत आहेत. विवेक जोशी, ओमकार राऊत, अनिशा हे कलाकारही आहेत.

नाटकाचे संगीत विजय गावंडे यांचे असून प्रकाशयोजना भूषण देसाई यांची आहे. अमिता खोपकर यांच्याकडे वेशभूषेची जबाबदारी असून नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांचे आहे.