सुहास जोशी

पैसा मग तो काळा असो की गोरा प्रत्येकाला तो हवा असतो. संधी मिळाली की अनेकजण त्याचा लाभ घेतातच. पण बेकायदेशीर मार्गाने मिळवलेला पैसा कायदेशीर मार्गाने पुन्हा वापरायचा असेल तर त्यासाठी अनेक खेळ खेळावे लागतात. त्यातूनच मग अशा पैशाचा मोह निर्माण झाला नाही तरच नवल, पण मग हा मोह अनेकदा अंगाशी येतो, त्यातून निर्माण झालेल्या दुष्टचक्रातून बाहेर पडणं कठीण होतं आणि त्या पैशाच्या खेळापायी सतत टांगती तलवार घेऊ न फिरणं नशिबी येतं. ओझार्क ही वेबसीरिज नेमकी याच वळणाने जाणारी आहे.

flowers, plant flowers,
निसर्गलिपी : हिरवा कोपरा
Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Anita Sangle of Vaibhavalakshmi Builders and Developers and Union Commerce and Industry Minister Piyush Goyal
नवोन्मेषाचा ‘तेजांकित’ सोहळा…

मार्टी ब्राइड आणि ब्रुस हे दोघेही शिकागोस्थित गुंतवणूक सल्लागार असतात. दोघांचाही संयुक्त व्यवसाय असतो. इतर अनेक गुंतवणूक योजनांबरोबरच ते दोघेही मेक्सिकोमधील दुसऱ्या क्रमांकाच्या ड्रग कार्टेलचे काळे पैसे फिरवून कायदेशीर करून देण्याचा व्यवसायदेखील करत असतात. ब्रुसला या पैशाचा मोह पडतो आणि तो युक्तीने त्यातील ऐंशी दशलक्ष डॉलर्स लंपास करतो. हे ड्रग कार्टेलला समजण्यास तीन वर्षे जातात. पण जेव्हा समजते तेव्हा तो थेट ब्रुस आणि त्याच्या साथीदारांना मारून टाकतात. मार्टीला त्याच वाटेने जावे लागणार असते, पण सतत पैसे फिरवणे, गुंतवणूक करणे हेच डोक्यात असणारा मार्टी ड्रग कार्टेलला पैसे फिरवण्याचे एक मोठे आमिष दाखवतो. त्यासाठी तो ओझार्क हे पर्यटनस्थळ कसे योग्य आहे ते सांगतो. ओझार्क येथे होणारी पर्यटकांची गर्दी, त्यांच्याकडून मुक्तपणे खर्च होणारे रोख पैसे आणि मुख्यत: शहरापासून कोसो दूर असणे. जेणेकरून अशा उपद्व्यापांवर लक्ष देणाऱ्या सरकारी यंत्रणेला गाफील ठेवणे शक्य होऊ  शकेल. ड्रग कार्टेल त्याची ही योजना मान्य करतो व ब्रुसने बुडवलेले पैसे मार्टीला परत द्यायला लावतो. आणि पुन्हा तेच पैसे तीन महिन्यांत कायदेशीर करून देण्याचे काम मार्टीला देतो.

अर्थातच मार्टीला हे पैसे ओझार्कमध्ये जाऊ न फिरवायचे असतात. मार्टी शिकागोतला सगळा व्यवसाय गुंडाळून ओझार्कला येतो आणि त्यातून एक न संपणारे असे दुष्टचक्र सुरू होते. ओझार्कमध्ये त्याला तेथील स्थानिक घटकांना तोड द्यावे लागतेच, पण त्याचबरोबर त्याच्या घरातील बिघडलेल्या परिस्थितीनेही तो जेरीस येतो.

तसे या कथेमध्ये फार काही नावीन्य वगैरे नाही. अशा प्रकारच्या अनेक सीरिज, चित्रपट येऊ न गेले आहेत. फक्त येथे स्थळ वेगळे आहे इतकेच काय ते नावीन्य म्हणता येईल. पण तुलनेने अतिरंजित कथानकापेक्षा येथे वास्तवाला अधिक महत्त्व दिले आहे हे मात्र नक्की. दणादण गोळीबार, खून अशी रचना येथे नाही की उगाच दणादण प्रेमात पडणेदेखील नाही की अतक्र्य वाटाव्या अशा गोष्टी घडत नाहीत.

खरे तर सारा मामला हा पैसे फिरवण्याबद्दलचा आहे. पण एकूण कथानकात या ट्रीकला फारसा वाव मिळालेला नाही. किंबहुना यात पैसे फिरवणे यापेक्षा ते करताना होणारी मानसिक ओढाताण, नव्या ठिकाणी गेल्यामुळे येणारी आव्हाने यावरच अधिक भर दिसून येतो. पण तेदेखील काही फार प्रभावी पद्धतीने मांडलेले नाही. कथेचा परिघ तसा अगदीच मर्यादित आहे. पण त्यामध्ये एकात एक घडणाऱ्या घटना हा भाग बरा वाटतो. ते नसते तर हे सारे कथानक अगदीच सपक झाले असते.

पण तरीदेखील ही सीरिज बऱ्यापैकी प्रसिद्ध झाली आहे. कदाचित किमान नाटय़मयता हा भाग प्रेक्षकांना बरा वाटला असावा. पण या किमान नाटय़मयतेबरोबरच कथानकाला थोडीशी तरी गती अपेक्षित होती. सुरुवातीच्या दोन भागांतील वेगवान घडामोडीनंतर कथा एक एक दिवसाने पुढे ढकलली जाते. तीन महिन्यांच्या मर्यादेत कथा घडत असल्याने अशी मांडणी योग्य वाटत असली तरी त्यातून हाताला खूपच कमी गोष्टी लागतात. दोन सीझनमध्ये ही सीरिज संपेल असे वाटत असताना शेवटच्या भागात पुन्हा नाटय़मयता आणत तिसऱ्या सीझनचे सूतोवाच केलेले दिसून आले होतेच, आणि आता याच महिन्यात तिसऱ्या सीझनची घोषणादेखील झाली आहे. वेळ घालवायला म्हणून काही पाहायचे असेल तर पाहायला हरकत नाही इतपतच याचे महत्त्व आहे.

ओझार्क

सीझन – पहिला आणि दुसरा

ऑनलाइन अ‍ॅप – नेटफ्लिक्स