28 February 2021

News Flash

निवड आणि परवडीच्या मध्ये कुठेतरी…

नयनतारा, अनुराधा आणि माशा हे तीन वेगवेगळ्या काळाचे तीन धागे एकमेकांशी रक्ताच्या नात्याने जोडले गेलेले.

|| रेश्मा राईकवार

नेमून दिलं तसं आयुष्य जगावं, असं क धी होत नाही. साध्या सरळ माणसाच्या आयुष्यात येणारे प्रसंगही कित्येकदा असे असतात की त्या प्रसंगात तो नेमका कसा वागेल?  काय निर्णय घेईल? याचा नेम नाही. तरीही पुढे जाताना प्रत्येकाला समोर येणाऱ्या पर्यायांपैकी एक निवडूनच वाटचाल करावी लागते. एकाची निवड ही दुसऱ्यासाठी अनेकदा परवड ठरते. आई-वडील आणि मुलांच्या नात्यात तर हा खेळ कायम रंगतो. आपल्या वाट्याला आले ते आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये, हाच विचार धरून मग दुसरा पर्याय निवडला जातो. पण दरवेळी ही निवड व्यक्तिसापेक्षच असते, हे कित्येकदा लक्षात येत नाही. आणि मग वर्षानुवर्षं एकमेकांना बोल लावत आयुष्य सरतं. या निवड आणि परवडीच्या मध्ये कु ठेतरी तो सत्य काय आहे हे उलगडणारा एक क्षण येतो… रेणुका शहाणे दिग्दर्शित ‘त्रिभंग’मध्ये तीन पिढ्यांतील स्त्रियांच्या माध्यमातून रागलोभ विसरून नव्याने जगायला शिकवणारा हा एकच क्षण अनुभवायला मिळतो.

नयनतारा, अनुराधा आणि माशा हे तीन वेगवेगळ्या काळाचे तीन धागे एकमेकांशी रक्ताच्या नात्याने जोडले गेलेले. नयनतारा (तन्वी आझमी) या प्रथितयश लेखिका आहेत. मनापासून लिखाणात रमणाऱ्या नयनला सतत मुलांक डे दुर्लक्ष करते म्हणून सासूचे टोमणे खावे लागतात. मुलं आणि लिखाण दोन्ही जपण्याची आस असलेली नयन अखेर नवऱ्यापासून वेगळी होते. तिच्या या निर्णयामुळे अनुराधा (काजोल) आणि रोबिंद्रो (वैभव तत्त्ववादी) ही तिची दोन्ही मुलं मात्र वडिलांपासून दुरावतात. नयनच्या पतीचेही आपल्या मुलांवर खूप प्रेम आहे, मात्र तरीही तो कधीच पत्नीकडे किं वा मुलांकडे फिरकत नाही. दोन्ही बाजूंनी दुखावलेली मुले आईबद्दल कायम मनात सल बाळगून असतात. त्याच वेळी नयनच्या आयुष्यात आलेल्या एका व्यक्तीमुळे अनुचे जगणे नरक बनते. अनु स्वत:हून कधीच आईकडे व्यक्त होत नाही आणि नयनला वास्तवात काय घडून गेले याची कल्पना येईपर्यंत खूप उशीर होतो. या तिघांच्या आयुष्यातला हा तिढा नयन हृदयविकाराच्या धक्क्याने कोमात गेल्यावरही सुटलेला नसतो. रुग्णशय्येवर असलेली नयन आणि सतत तिच्याबद्दलचा राग मनात बाळगून असलेली अनु यांच्यातील गुंता उलगडायला तिसरीच व्यक्ती कारणीभूत ठरते. वरवर पाहता ही गोष्ट या तिघींची असली तरी मुख्यत: ती अनुभोवती फिरते. त्यामुळेच माशाचा वावरही चित्रपटात पहिल्यापासून असला तरी तिचे असणे हे अनुची गोष्ट पुढे नेण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. स्त्रीवादी विचारांची आजी आणि स्वातंत्र्याचाच पुरस्कार करणाऱ्या आईची मुलगी असूनही माशा मात्र स्वत:चे भविष्य एका मोठ्या पारंपरिक विचारसरणीच्या कु टुंबात पाहात असते. माशाच्या या वागण्यामागचे कारण चित्रपटातच पाहणे इष्ट ठरेल. आई-वडील म्हणून आपल्या मुलांना चांगले आयुष्य मिळावे, यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. त्याच वेळी त्यांची स्वत:च्या अस्तित्वाचीही लढाई सुरू असते. याचे थोडेबहुत परिणाम हे एकमेकांवर होणारच, मात्र त्यांना चुकीचे ठरवून संवादच तोडण्यापेक्षा नव्याने संवाद साधणं हा खरा मार्ग ठरू शकतो, असं काहीसं सुचवण्याचा प्रयत्न लेखिका-दिग्दर्शिका रेणुका शहाणे यांनी ‘त्रिभंग – तेढी, मेढी क्रे झी’ या चित्रपटातून के ला आहे.

तीन पिढ्यांतील स्त्रिया, त्यांची मानसिकता, त्यांचे भावनिक बंध असा सगळा नाट्यमय मामला असतानाही कु ठेही हा चित्रपट रेंगाळत बसत नाही किं वा भावनामय नाट्यात वाहून जात नाही, हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. विशेषत: नयनची व्यक्तिरेखा खूपच प्रगल्भ पद्धतीने रंगवण्यात आली आहे, त्याउलट अनुची भूमिका ही कायम आक्रस्ताळी, सतत जगावर चिडलेली अशी आहे. अर्थात तिच्यातही कालांतराने बदल घडतो. मात्र त्यामुळे चित्रपटभर काजोलचेच अस्तित्व प्रामुख्याने जाणवत राहते. तन्वी आझमी, काजोल आणि मिथिला पालकर अशा तिन्ही त्या त्या काळातील स्त्रीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सक्षम अभिनेत्री आहेत. मात्र तन्वी आझमी आणि मिथिला यांच्या तुलनेत काजोलचा पडद्यावरचा वावर खूप जास्त आहे. त्यामुळे एका क्षणी ही गोष्ट फक्त आणि फक्त अनुचीच वाटत राहते. रोबिंद्रोच्या भूमिके त वैभव तत्त्ववादीला पाहणं ही रसिकांसाठी पर्वणी आहे, मात्र त्याच्या वाट्याला फारसे संवाद नाहीत. नयनच्या तरुणपणीच्या छोटेखानी भूमिके त का होईना अभिनेत्री श्वोता मेहेंदळे लक्षात राहते. या चित्रपटाचा कथाविचार खूप चांगला आहे आणि तो बराचसा संयत पद्धतीने मांडण्यात दिग्दर्शिका म्हणून रेणुका शहाणे यशस्वी ठरल्या आहेत. अर्थात, सुरुवातीपासूनच थोडी एकांगी ठरलेली अशी ही कथा जणू अनुच्याच ‘त्रिभंग’ अवस्थेपुरती मर्यादित आहे की काय? हा विचार या चित्रपटाचा परिणामही मर्यादित करतो.

त्रिभंग

दिग्दर्शक – रेणुका शहाणे

कलाकार – तन्वी आझमी, काजोल, मिथिला पालकर, वैभव तत्त्ववादी, मानव गोहिल, कंवलजीत सिंग, श्वेता मेहेंदळे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2021 12:03 am

Web Title: article live life occasion mother father and children in a relationship akp 94
Next Stories
1 नताशा-वरुणच्या लग्नाचे बच्चन कुटुंबीयांना नाही आमंत्रण, गोविंदाचेही यादीमध्ये नाव नाही?
2 ‘बच्चन पांडे’मधील अक्षय कुमारचा लूक ठरतोय चर्चेचा विषय
3 रोहित शेट्टीने हाताने उचलली कार, व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X