रेश्मा राईकवार

घरोघरी सगळीच मंडळी एका जागी थांबली आहेत. शरिराने ती एका ठिकाणी अडकली असली तरी नित्यनूतन काही हवे, ही मनाची मागणी संपलेली नाही. कु ठलाही भेदाभेद न होता कलाकार असोत, कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचारी असोत, उद्योजक असोत वा हातावर पोट असणारी मंडळी असोत.. सगळेच करोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी लॉकडाऊन परिस्थितीत घरात अडकू न पडली आहेत. एरव्ही कलाकार मंडळी सातत्याने टीव्ही, चित्रपटगृहाचा पडदा या ना त्या माध्यमातून लोकांसमोर असतात. ती त्यांची कला सादर करत असतात आणि लोक तो कलाविष्कार अनुभवून सुखावतात. मात्र, लॉकडाऊन परिस्थितीत थांबलेला हा संवाद व्हर्च्युअल पध्दतीने सुरू व्हावा आणि सध्याच्या परिस्थितीत लोकांच्या मनात आलेले नकारात्मकतेचे मळभ वेगवेगळ्या सादरीकरणाच्या माध्यमातून दूर करावे, यासाठी काही कलाकारांनी आपापल्या पध्दतीने प्रयत्न सुरू केले आहेत.

गेल्या दोन-तीन दिवसांत मराठी कलाकार-गायक- गीतकार यांच्या फे सबुक पेजवर कधी काही गाणी, कधी गोष्टी, कधी मुलाखती असे वेगवेगळे प्रकार लोकांपर्यंत पोहोचत आहेत. ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेता कुशल बद्रिके  याने त्याच्या कु टुंबाबरोबर सादर केलेले ‘गो करोनिया’ हे गाणे सध्या व्हायरल झाले आहे. या गाण्याबरोबरच आणखी एक भारुडही कु शलने, पत्नी आणि मुलांबरोबर सादर के ले आहे. घरातल्या घरात आपल्या आवडत्या कलाकाराने सादर के लेले हे प्रयोग लोकांच्या भलतेच पसंतीस उतरले आहेत. या गाण्यातून किंवा भारुडाच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन तर होईलच, मात्र सध्याच्या परिस्थितीत लोकांनी काय काळजी घ्यायला हवी, सरकार-प्रशासनातर्फे  सुरू असलेले प्रयत्न आणि त्याला नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी कशाप्रकारे साथ दिली पाहिजे, यावर प्रबोधन करण्याचा उद्देश प्रामुख्याने दिसून येतो. सध्या अशापध्दतीची प्रबोधनात्मक आणि मनोरंजक गाणी, गीतं वेगवेगळ्या कलाकारांकडून सादर होताना दिसत आहेत. गायक आनंद शिंदे यांनीही फेसबुक पेजच्या माध्यमातून एक गाणे सादर केले आहे. निलेश शिंदे यांनी लिहिलेले हे गाणे केवळ हार्मोनियमच्या साथीने आनंद शिंदे यांनी सादर के ले आहे. ‘आपल्या हाताने हे जीवघेणे संकट ओढवू नका.. बांधवांनो घराबाहेर पडू नका’, अशा या गीताच्या ओळी आहेत. करोनाचे संकट आपणच स्वच्छतेची काळजी घेऊन आणि नियम पाळून दूर करू शकतो, हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी या गीताच्या माध्यमातून के ला आहे. असाच प्रयत्न नंदेश उमप यांनीही पोवाडय़ाच्या माध्यमातून केला आहे.

‘आला आला बिकट काळ आला, जगावरी घाला..’, असे नंदेश उमप यांनी सादर केलेल्या या पोवाडय़ाचे बोल आहेत. या पोवाडय़ाबद्दल बोलताना नंदेश उमप यांनी सांगितले, मुळात भारूड आणि पोवाडय़ाचा जन्मच जनजागृतीसाठी झाला आहे. ज्या ज्या वेळी संकटं आली किं वा बिकट परिस्थिती आली तेव्हा तेव्हा लोककलाकारांनी, शाहिरांनी पोवाडे आणि भारूडाच्या माध्यमातून प्रबोधन के लं आहे. किल्लारीचा भूकं प असेल किं वा नर्मदा बचाओ आंदोलन असेल प्रत्येकवेळी शाहिरांनी पोवाडय़ांच्या माध्यमातून ज्वलंतपणे लोकांसमोर हे विषय मांडले. तीचप्रबोधनाची मशाल पेटवत ठेवण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे. सध्या करोना विषाणूच्या भीतीने लोक नुसते घरात अडकलेले नाहीत, तर त्यांच्या मनात असंख्य नकारी विचार मूळ धरत आहेत. हे विचार त्यांच्या मनातून गेले पाहिजेत आणि सकारात्मक विचारांचे प्राण त्यांच्या मनात फुं कले पाहिजे, या विचाराने हा पोवाडा लिहिला आहे, असे त्यांनी सांगितले. अगदी पाच मिनिटांत सुचलेला हा पोवाडा लिहून त्यांनी सादर के ला आहे. या पोवाडय़ाला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे, पोवाडय़ातून काही लोकांनी जरी हे विचार कृतीत आणण्याचा प्रयत्न के ला तर हा प्रयत्न फळाला येईल, असे आपल्याला वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या रक्तदान करणे खूप गरजेचे आहे, त्यामुळे रक्तदानासाठी आवाहन करणारा पोवाडा रचण्याचाही आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले. एकीकडे शाहिरांचा हा प्रबोधनाचा प्रयत्न सुरू आहे तर दुसरीकडे आपल्या कवितांच्या माध्यमातून कधी गंभीरपणे, तर कधी मिश्कीलपणे लोकांना परिस्थितीचे गांभिर्य कळमवे आणि त्यांनी घरीच बसून आपला वेळ सत्कारणी लावावा, अशा आशयाची कविता गीतकार वैभव जोशी यांनी के ली आहे. ‘काय रे मित्रा.. काय प्रॉब्लेम आहे?,  मराठी समजंना झालं, घरी बसा.. आता यात काय अवघड आहे’, असा सवाल वैभव जोशी यांनी के ला आहे.

मिती गृपच्या माध्यमातून उत्तरा मोने यांनी के वळ मोठयांसाठी नाही तर लहानग्यांनाही एकत्र ऐकता-पाहता येईल असा गोष्टी सांगण्याचा उपक्रम सुरु के ला आहे. मुळात आपल्याकडे लोकांना लाकॅ डाऊनची सवय नाही. त्यामुळे घरात बसून ते कं टाळतात आणि मग सकारात्मक विचारांपासून दूर जाऊ लागतात. तर रोज संध्याकाळी बरोबर ५ वाजता सद्यस्थितीत उपयुक्त ठरतील असे विचार मांडणाऱ्या गोष्टी मी सांगते आहे, असे उत्तरा मोने यांनी सांगितले. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर त्यांनी या उपक्रमाची गुढी उभारली. पहिल्याच दिवशी मी दोन मित्रांची गोष्ट सांगितली होती. दुसऱ्या गोष्टीत काळ कसाही असला तरी सचोटीने व्यवहार करणे किती महत्वाचे आहे हे विशद करणारी गोष्ट सांगितली. मला या उपक्रमाला लोकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पहिल्याच गोष्टीला २००० इतकी दर्शकसंख्या होती. लोकांना गोष्ट ऐकायला आजही आवडतं आहे, ही यातली खूप सकारात्मक बाब आहे, असं आपल्याला वाटत असल्याचं त्या सांगतात. याच माध्यमातून मुलांकडून काही सर्जनशील गोष्टी करून घेणारा उपक्रम सादर करण्याचाही त्यांचा विचार असून येत्या ७-८ दिवसांत त्यादृष्टीने ठोस कामं होतील, अशी माहिती त्यांनी दिली.

सध्या अलगीकरणामुळे घरातच अडकलेले कलाकार आणि त्यांचे चाहते या दोघांनाही ऑनलाईन माध्यमातून एकत्र आणून मैफल सजवणारा उपक्रम दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांनी सुरू के ला आहे. ‘अल्पविराम’ असे या कार्यक्रमाचे नाव आहे. यात एक सूत्रधार, एक कलाकार, गायक अशी तीन-चार मंडळी एकाचवेळी ‘झूम’ या ऑनलाईन माध्यमावर एकत्र येऊन हा कार्यक्रम सादर करतील, अशी याची कल्पना आहे, असे श्रीरंग गोडबोले यांनी सांगितले. कलाकार घरात अडकू न पडले आहेत, कु ठलेच इव्हेंट होत नाहीत, सादरीकरण नाही, त्यामुळे त्यांनाही आपली कला सादर करता येत नाही, याची खंत आहे.

रोज त्यांच्यासमोर त्यांचा असा प्रेक्षकवर्ग असतो. तर या प्रेक्षकवर्गाला व्हर्च्युअल माध्यमातून कलाकारांशी जोडत हा संवाद सुरू करावा, असा विचार यामागे होता, असेही त्यांनी सांगितले. आतापर्यंत राहुल देशपांडे, सुबोध भावे यांनी आपापल्या पध्दतीने कार्यक्रम सादर के ले, शनिवारी भार्गवी चिरमुलेचे नृत्य आणि वैभव जोशी यांच्या कविता सादर झाल्या. रविवारी आम्ही भाडिपाबरोबर मिळून एक कार्यक्रम सादर करतो आहोत, तर सोमवारी गीतकार स्वानंद किरकिरे यांची खास उपस्थिती असेल. कु ठेही कलाकार, तंत्रज्ञ प्रत्यक्ष एकत्र न येता के वळ तंत्रज्ञानाच्या आधारे एकमेकांसमोर येऊन हा दुवा साधता आहेत, हे त्याचे विशेष आहे, असेही गोडबोले यांनी सांगितले.

रोज नविन कार्यक्रम सादर होत असल्याने रोजचे एक-दोन तास छान निघून जातात, अशी प्रतिक्रिया लोकांनी दिली असल्याची माहितीही त्यांनी दिली. असाच काहीसा सर्जनशील नाटय़प्रयोग रंगकर्मी अतुल पेठे यांनीही के ला आहे. डिजिटल थिएटर या संकल्पनेंतर्गत त्यांनी तीन छोटे नाटय़प्रयोग सादर के ले आहेत. ‘थिएटर इन द टाईम ऑफ कोरोना’ या विचारांतर्गत त्यांनी सादर के लेला हा नाटय़ानुभव युटय़ूबवर पाहता येईल.  असे अनेक आनंदाचे प्रयोग सध्या कलाकारांकडून सुरू आहेत आणि त्याला रसिक प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असल्याने कलेचा हा प्रवाहो करोनाच्या सावटाखाली दबून राहिलेला नाही, याचीच प्रचिती सध्या येते आहे.