News Flash

आशा भोसलेंनी सांगितली लता मंगेशकर रुग्णालयात असतानाची आठवण

रविवारी लता मंगेशकर यांना सुटी देण्यात आली होती.

लता मंगेशकर यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे १२ नोव्हेंबर रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. लता मंगेशकर घरी परतल्यानंतर आशा भोसले यांनी आनंद व्यक्त केला आहे.

जेव्हा जेव्हा शाहिद तो चित्रपट पाहायचा तेव्हा त्याला कोसळायचे रडू

“आम्ही लतादीदींची आतुरतेने वाट पाहात होतो. त्यांच्या घरी परतल्यामुळे आम्ही खुप आनंदी आहोत. लता मंगेशकर रुग्णालयात असताना त्यांनी आपल्या सुरेल आवाजात गायलेली आणि अजरामर झालेली सर्व गाणी मला आठवत होती.” अशा शब्दात आशा भोसले यांनी प्रतिक्रिया दिली.

सलमान-कतरिना पुन्हा एकत्र, घेतली बांगलादेशच्या पंतप्रधानांची भेट

रविवारी लता मंगेशकर यांना सुटी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी स्वत: ट्विट करुन आपण घरी परतल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली. “नमस्कार. गेल्या २८ दिवसांपासून मी ब्रीच कँडी रूग्णालयामध्ये होते. मला न्युमोनिया झाला होता. मी प्रकृती पूर्णपणे ठीक झाल्यानंतरच घरी जावं, अशी डॉक्टरांची इच्छा होती. आज मी घरी आले आहे. ईश्वर, आईवडिलांचे आशिर्वाद आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि प्रार्थनांमुळे मी आता ठीक आहे. मी तुम्हा सगळ्यांची मनापासून आभारी आहे. ब्रीच कँडीमधील डॉक्टर खरच देवदूत आहे. तेथील सर्व कर्मचारी खुपच चांगले आहेत. तुम्हा सगळ्यांची मी पुन्हा मनापासून आभार आहे. हे प्रेम आणि आशिर्वाद असाच रहावा,” असं ट्विट लता मंगेशकर यांनी केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2019 5:19 pm

Web Title: asha bhosle on sister lata mangeshkar her songs came back rushing to me mppg 94
Next Stories
1 लता मंगेशकर यांचा रुग्णालयातील ‘तो’ फोटो होतोय व्हायरल
2 हिवाळ्यातील थकवा दूर करण्यासाठी ‘हे’ सहा उपाय कराच
3 पावनखिंड गाजवणाऱ्या बाजीप्रभूंची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर
Just Now!
X