अलोक राजवाडे दिग्दर्शित ‘अश्लील उद्योग मित्रमंडळ’ चित्रपटाचे नाव बदलण्यात यावे अशी मागणी ब्राह्मण महासंघाने केली आहे. असे चित्रपट हे सॉफ्ट पॉर्न प्रकारातील चित्रपट आहे असा आक्षेप ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीशी बोलताना घेतला आहे. मात्र सॉफ्ट पॉर्नसंदर्भातला आक्षेप हस्यास्पद आहे, असं उत्तर आलोक राजवाडे यांनी दिलं आहे. तसेच “सांस्कृतीक ब्राह्मण्य गाजवण्याला आणि संस्कृतीचे ठेकेदार आपण आहोत या मानसिकतेला आपला विरोध आहे,” असा टोलाही राजवाडे यांनी लगावला आहे.

‘अश्लील उद्योग मित्रमंडळ’ हे नाव आपल्या संस्कृतीला हे शोभत नाही. अश्लील हा शब्द आपण चांगल्या अर्थाने वापरत नाही त्यामुळे चित्रपटाचं नाव बदलावं असं मत दवे यांनी मांडले. यावर उत्तर देताना चित्रपटाचे दिग्दर्शक अलोक राजवाडे यांनी या चित्रपटाला सेन्सॉरचे U/A (अ/व) प्रमाणपत्र मिळालं असल्याचं सांगितलं. अश्लील चित्रपट बनवण्याचा आमचा हेतू असता तर आम्हाला U/A प्रमाणपत्र नक्कीच मिळालं नसतं, असंही अलोक म्हणाले. ब्राह्मण महासंघाच्या आक्षेपावर उत्तर देताना अलोक राजवाडे यांनी मांडलेले मुद्दे खालीलप्रमाणे…

Pakistani actor Imran Abbas claims he was offered Aashiqui 2
“आशिकी २, पीके, हीरामंडीची ऑफर मिळाली होती,” पाकिस्तानी अभिनेत्याचा दावा; म्हणाला, “महेश भट्ट…”
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

…म्हणून आरोप मागे घ्यावा

या चित्रपटाला सेन्सॉरचे प्रमाणपत्र मिळालं आहे. हे प्रमाणपत्र A (अ) प्रमाणपत्र नसून चित्रपटाला U/A (अ/व) प्रमाणपत्र मिळालं आहे. कायदेशीर पद्धतीने आम्ही चित्रपासाठी प्रमाणपत्र मिळवलं आहे. आमचा या संविधानिक प्रक्रियेवर विश्वास आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपानुसार कोणता अश्लील चित्रपट बनवण्याचा आमचा हेतू असता तर आम्हाला U/A प्रमाणपत्र नक्कीच नसतं मिळालं. त्यांनी हा आरोप मागे घ्यावा असं मला वाटतं.

पाहा फोटो >> ‘सविता भाभी… तू तिथंच थांब!’च्या होर्डिंग्जमुळे पुणेकर चक्रावले

ब्राह्मण्य गाजवण्याला विरोध…

कोणत्याही प्रकारचं सांस्कृतीक ब्राह्मण्य गाजवण्याला माझा विरोध आहे. मी इथे ब्राह्मण जातीबद्दल बोलत नसून ब्राह्मण्याबद्दल बोलतोय. त्यामुळे संस्कृतीचे ठेकेदार आपण आहोत या एकंदरित मानसिकतेवरच माझा आक्षेप आहे. कारण संस्कृती कोण्या एकाची नाहीय. संस्कृतीवर कोण्या ऐकाची मक्तेदारी नाहीय.


उलट हा चित्रपट…

आपण सोज्वळ चेहरा घेऊन समाज म्हणून वावरतो आहोत. तर आपण खरचं इतके सोज्वळ आणि सात्विक आहोत का हा विचार करण्याची आता वेळ आली आहे. आपल्या समाजाचा खरा चेहरा मांडण्याचा, खरी परिस्थिती मांडण्याचा एक कलाकार म्हणून आम्ही प्रयत्न केला आहे. हा कोणत्याही प्रकारे भावना उद्यापित करणारा चित्रपट नाहीय. उलट आपण समाज म्हणून स्त्रियांकडे काय पद्धतीने बघतो याअर्थाने हा चित्रपट आहे. हा स्त्रियांच्या वस्तुकरणाविरोधात म्हणजेच ऑक्जेक्टीफिकेशनविरोधात बोलणारा चित्रपट आहे.