अशोक सराफ मराठी सिनेसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. जबरदस्त अभिनय आणि अफलातून टायमिंगच्या जोरावर त्यांनी अभिनयसृष्टीत आपला स्वतंत्र ठसा उमटवला. सध्या देशभरात दिवाळी साजरी केली जात आहे. दिवाळीच्या निमित्ताने अशोक सराफ यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या आयुष्यातील एक अवाक् करणारा किस्सा सांगितला.

अशोक सराफ आपल्या मुलाच्या आजारपाणात त्याच्या पासून दूर राहण्याचा प्रयत्न करत. त्यांच्या मुलाचे नाव अनिकेत असे आहे. अनिकेत लहान असताना त्याला धुराचा त्रास होत असे. दिवाळीच्या दिवसांत तर फटाक्यांमुळे तयार होणाऱ्या धुरामुळे अंकित खुप आजारी पडत असे. त्याला प्रचंड खोकल्याचा त्रास होत असे. त्यावेळी वेळी अशोक सराफ आपल्या मुलापासून दूर राहात. कारण ते प्रचंड संवेदनशील व्यक्ति आहेत. त्यांना आपल्या मुलाला होणारा त्रास सहन होत नसे. त्यामुळे मुलाच्या आजारपणात अशोक सराफ त्याच्यापासून शक्यतो दूर राहण्याचा प्रयत्न करत असे. असे त्यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

९०च्या दशकात अशोक सराफ एकाच वेळी अनेक चित्रपटांमध्ये काम करत होते. त्यांच्या सिनेकारकिर्दीतील तो सुवर्णकाळ होता असे म्हटले जाते. सततच्या चित्रिकरणामुळे त्यांना महिनोंमहिने आपल्या घरापासून दूर राहावे लागत असे. म्हणून त्याकाळी आपल्या कुटुंबासाठी वेळ काढणे त्यांना शक्य होत नव्हते. असेही अशोक सराफ मुलाखतीत म्हणाले.