News Flash

रेणुका शहाणेंच्या सोशल मीडियावर व्यक्त होण्यावर पती आशुतोष राणा म्हणतात..

सोशल मीडियावर रेणुका शहाणे बेधडकपणे आपली मतं व्यक्त करताना दिसतात.

रेणुका शहाणे, आशुतोष राणा

एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियावर सेलिब्रिटी कसे व्यक्त होतात किंवा ते व्यक्त होतात की नाही हे सध्या फार महत्त्वाचं मानलं जातं. काही अभिनेते व अभिनेत्री चालू घडामोडींवर परखड मत व्यक्त करतात तर काही सोशल मीडियावर व्यक्त होत नाहीत. ट्विटरवर सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक नाव आवर्जून घेतलं जातं ते म्हणजे अभिनेत्री रेणुका शहाणे. राजकीय, सामाजिक, मनोरंजन अशा विविध गोष्टींवर रेणुका ट्विटरवर व्यक्त होताना पाहायला मिळतात. याविषयी त्यांचे पती आशुतोष राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अनेकदा कलाकार महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य करण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. अशावेळी रेणुका शहाणे मात्र बेधडकपणे आपलं मत व्यक्त करतात. त्यावर आशुतोष म्हणाले, ‘मला वाटतं की हा त्यांच्या स्वभावाचा एक भाग आहे. विरोधाच्या परिस्थितीतही स्वत:चं ठाम मत व्यक्त करण्यासाठी खूप मोठी हिम्मत लागते. त्यांचा हा स्वभाव खरंच कौतुकास्पद आहे.’

आणखी वाचा : ‘तुला पाहते रे’नंतर कोणती मालिका? सुबोध म्हणतो…

एखादा चित्रपट असो किंवा सामाजिक मुद्दा, रेणुका शहाणे नेहमीच परखडपणे त्यांचं मत मांडतात. ट्विटर आणि फेसबुकवरील त्यांच्या पोस्टला चाहत्यांकडून भरभरून लाइक्सही मिळतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2019 1:46 pm

Web Title: ashutosh rana reacts on renuka shahane posts on social media ssv 92
Next Stories
1 करिना कपूरला साकारायची श्रीदेवीची ही भूमिका
2 …म्हणून ‘झीरो’नंतर अनुष्काने घेतला चित्रपटातून ब्रेक!
3 Photo : जबरा फॅन! चाहत्याने गाडीवर लिहिलं शिवानीचं नाव
Just Now!
X