News Flash

पाकविरुद्धच्या दमदार खेळीनंतर अनुष्काचा विराटला फोन?

दोघांमध्ये आता सारंकाही आलबेल असल्याचं बोललं जात आहे.

पाकविरुद्धच्या दमदार खेळीनंतर अनुष्काचा विराटला फोन?
आशिया चषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराटने साकारलेल्या झंझावाती खेळीनंतर अनुष्काने विराटला फोन करून त्याच्या खेळीचे कौतुक केले.

भारतीय संघाचा सध्याचा आघाडी फलंदाज विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा या दोघांच्या नात्यात मतभेद निर्माण झाल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. पण या चर्चेला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. कारण दोघांमध्ये सारंकाही आलबेल असल्याचं बोललं जात आहे. नुकतेच आशिया चषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराटने साकारलेल्या झंझावाती खेळीनंतर अनुष्काने विराटला फोन करून त्याच्या खेळीचे कौतुक केल्याचे वृत्त एका इंग्रजी संकेतस्थळाने दिले आहे.

विराटचा विवाह प्रस्ताव अनुष्काने फेटाळला?

भारतीय संघाचे महत्त्वाचे तीन फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर पाकिस्तानी गोलंदाजीच्या तोफखान्याचा टीच्चून सामना करत कोहलीने ४९ धावांची दमदार खेळी साकारली होती. विराटच्या या खेळीचे जगभरातून कौतुक केले गेले. पाकिस्तानी खेळाडूंनीही विराटच्या खेळीचे गोडवे गायले. मग अनुष्कालाही राहवले नाही. तिनेही विराटला फोन करून शुभेच्छा दिल्या.

VIDEO: ‘जो वादा किया वो निभाना पडेगा…’ विराटचा अनुष्काला संदेश?

गेल्या काही दिवसांपासून विराट आणि अनुष्कामध्ये काहीतरी बिनसल्यासे समोर आले होते. याआधी अनुष्का विराटला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानात हजेरी लावत होती. पण आशिया चषकात एकाही सामन्याला ती दिसली नाही. याशिवाय, या दोघांनीही इंस्ट्राग्राम अकाऊंटवर एकमेकांना अनफॉलो केले होते. त्याचीही जोरदार चर्चा रंगली. मात्र, अनुष्काने विराटला केलेल्या या फोनमुळे दोघांमध्ये निर्माण झालेल्या दुराव्याची आणि मतभेदाची अखेर होण्याची शक्यता आहे.

VIDEO: …तर भारतीय संघाची अडचण वाढेल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2016 4:09 pm

Web Title: asia cup 2016 india vs pakistan when virat kohli got a call from anushka sharma after the match
Next Stories
1 VIDEO: …तर भारतीय संघाची अडचण वाढेल
2 न्यूझीलंडचे माजी कर्णधार मार्टिन क्रो यांचे निधन
3 भारताचा अमिरातीवर सहज विजय
Just Now!
X