News Flash

जुन्या अंजली भाभीने मालिका सोडण्यावर निर्माते असिद मोदी यांनी सोडले मौन, म्हणाले..

जाणून घ्या काय म्हणाले..

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ या मालिकेत अंजली भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा मेहताने मालिका सोडली. जवळपास गेल्या १२ वर्षांपासून ती या मालिकेत काम करत होती. आता नेहाने मालिका सोडण्याबाबत मालिकेचे निर्माते असिद मोदी यांनी व्यक्तव्ये केले आहे.

‘नेहाने मालिका सोडली असली तरी देखील ती कायम तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेचा हिस्सा राहणार आहे. १२ वर्षे एकत्र काम केल्यानंतर तिच्यासोबत एक वेगळे नाते तयार झाले होते. जे मी शब्दांमध्ये नाही मांडू शकत’ असे त्यांनी म्हटले आहे.

‘तारक मेहता..’मध्ये ही ग्लॅमरस अभिनेत्री साकारणार अंजली भाभी, पाहा फोटो

नेहाने घेतलेल्या निर्णयाचा असिद आदर करतात असे देखील त्यांनी पुढे म्हटले आहे. तसेच भविष्यात पुन्हा नेहासोबत काम करायला आवडेल अशी इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री नेहाने जवळपास १२ वर्षांनंतर तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका सोडल्याचे समोर आले. त्यानंतर या मालिकेत सुनैना फौजदार अंजली भाभीची भूमिका साकारताना दिसत आहे. तिने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2020 6:34 pm

Web Title: asid modi talks about neha mehta after quite tarak mehta ka oolta chashma avb 95
Next Stories
1 डॉक्टर डॉन मालिकेला मिळणार नवं वळण…
2 अभिनेत्याच्या वाढिवसाचं होर्डिंग लावताना तीन चाहत्यांचा मृत्यू
3 ‘वंदे गणपती’ ला प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद पाहून सावनी रविंद्र म्हणते…
Just Now!
X