News Flash

‘आणि…डॉ. काशिनाथ घाणेकर’ची टीम पोहोचली असल्ल पाहुणे…च्या सेटवर

दिवाळी स्पेशल विशेष भाग नक्की पाहा

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ”आणि…डॉ. काशिनाथ घाणेकर” या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. या चित्रपटाच्या टीमने नुकतीच अस्सल पाहुणे इरसाल नमुनेच्या सेटवर हजेरी लावली होती. यामध्ये सुबोध भावे, सुमित राघवन, सोनाली कुलकर्णी, आनंद इंगळे यांचा समावेश होता. ८ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार असून कार्यक्रमामध्ये चित्रपटाच्या संपूर्ण टीमने खूप किस्से, आठवणी सांगितल्या. दिवाळीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुबोध भावेने मराठी रंगभूमी आणि चित्रपटाचा त्याला अभिमान आहे असे सांगितले.

वैदेही परशुरामीला तिला कुणावर आधारित असलेल्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल असे विचारले असता ती म्हणाली “रेखा” आणि अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेमध्ये कोण आवडेल यावर ती म्हणाली, “ सुबोध भावेबरोबर काम केले आहे तर, सुमित राघवन अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेमध्ये आवडतील”. सुबोध भावेला बालगंधर्व की लोकमान्य-एक युग पुरुष या आपल्या चित्रपटातील आवडत्या चित्रपटाची निवड करायला सांगितली. त्यावेळी बायोपिकची सुरुवात बालगंधर्व या चित्रपटापासून झाली … म्हणून बालगंधर्व” असे त्याने सांगितले. अस्सल पाहुणे इरसाल नमुने चा दिवाळी विशेष भाग “आणि…डॉ. काशिनाथ घाणेकर या चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबत कलर्स मराठीच्या साथीने तुमची दिवाळी खास करा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2018 7:48 pm

Web Title: assal pahune irsal namune set aani doc kashinath ghanekar team meet exciting diwali special episode
Next Stories
1 जयंत सावरकर, विनायक थोरात यांना शासनाचा रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर
2 राष्ट्रीय पुरस्कार विजेता सुजय डहाकेची ‘सेक्स, ड्रग्ज & थिएटर’ मराठी वेब सीरिज लवकरच
3 शाहरुख खानविरोधात आमदाराची पोलिसांत तक्रार; ‘झिरो’ सिनेमावरुन वाद
Just Now!
X