28 September 2020

News Flash

के. एल. राहुलच्या वाढदिवसानिमित्त अथियाची खास पोस्ट; ‘त्या’ शब्दाने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलेल्या शब्दाने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे.

अथिया शेट्टी, के.एल.राहुल

बॉलिवूड आणि क्रिकेट या दोन क्षेत्रांचं नातं तसं फार जवळचं आहे. बॉलिवूड आणि क्रिकेटमधील बऱ्याच जोड्या चर्चेत राहिल्या आहेत. या जोड्यांपैकी विराट कोहली- अनुष्का शर्मा, जहीर खान-सागरिका घाटगे आणि युवराज सिंग- हेजल कीच या जोड्यांनी लग्नगाठही बांधली आहे. या जोड्या कायमच चर्चेमध्ये असतात. त्यातच आता अथिया शेट्टी व क्रिकेटर के. एल. राहुल या दोघांच्या अफेअर्सच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. के. एल. राहुलच्या वाढदिवसानिमित्त अथियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलेल्या शब्दाने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे.

वाढदिवसाच्या शुभेच्छा देत अथियाने लिहिलं, ‘माय पर्सन’ (my person). यासोबतच तिने हृदयाचा इमोजी पोस्ट केला आहे. त्यामुळे अथियाने जाहिररित्या तिचं प्रेम व्यक्त केल्याच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये येत आहेत. अनेकांनी या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. अथिया व के. एल. राहुलच्या या फोटोवर नेटकऱ्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

View this post on Instagram

happy birthday, my person 🤍 @rahulkl

A post shared by Athiya Shetty (@athiyashetty) on

आणखी वाचा : क्वारंटाइनमध्ये माधुरीची लेकासोबत डान्स जुगलबंदी; शेवटपर्यंत पाहा व्हिडीओ

या दोघांनी रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली आतापर्यंत दिली नव्हती. एका मुलाखतीत अथिया म्हणाली होती, “मला माझं खासगी आयुष्य सार्वजनिक करायला मला कधीच आवडत नाही. मला माझं खासगी आयुष्य जपायला आवडतं. त्यामुळेच मला माध्यमांसमोर काही गोष्टी सांगायला आवडत नाही.”

दरम्यान, अथियाने २०१५ बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिने ‘हीरो’ चित्रपटात पहिल्यांदा काम केलं. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट यशस्वी झाला असून ती ‘मुबारक’ चित्रपटातही दिसली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2020 5:44 pm

Web Title: athiya shetty lovestruck birthday wish for her person kl rahul is all things cute ssv 92
Next Stories
1 Video : खरा मी, खोटा मी….गश्मीर महाजनीच्या लॉकडाऊनचे २८ दिवस
2 कंगनाची बहिण अडचणीत; आधी झाले अकाउंट सस्पेंड अन् आता पोलीस तक्रार
3 बबिता फोगटला केंद्र सरकारने सुरक्षा पुरवावी – कंगना रणौत
Just Now!
X