24 February 2021

News Flash

३० वर्षीय अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांनी सुरू केली चौकशी

अभिनेत्याने आत्महत्या केल्याचा संशय

‘अटॅक ऑन टायटन्स’ या अॅनिमे वेब सीरिजमुळे नावारुपास आलेला अभिनेता हरुमा मिऊरा याचा मृत्यू झाला आहे. तो केवळ ३० वर्षांचा होता. जपान टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार टोकियोमधील राहत्या घरी त्याने आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र त्याच्या घरात सापडलेल्या एका चिठ्ठीवरुन त्याने आत्महत्या केली असा कयास लावला जात आहे. पोलीस सध्या या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.

काही दिवसांपूर्वी हरुमाच्या मॅनेजरचा मृत्यू झाला होता. त्याने देखील आत्महत्याच केली होती असं म्हटलं जात आहे. हरुमा जेव्हा भेटायला त्याच्या घरी गेला तेव्हा त्याला तो मृत अवस्थेत सापडला. दोघांमध्ये खूप चांगली मैत्री होती. परिणामी मॅनेजरच्या मृत्यूचा मानसिक धक्का हरुमाला बसला अन् त्याने आत्महत्या केली, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी लावला आहे. पोलीस सध्या हरुमाच्या कुटुंबियांची व मित्रमंडळींची कसून चौकशी करत आहेत.

हरुमा मिऊरा जपानी सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेता होता. १९९९ साली ‘निल’ या चित्रपटातून त्याने सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने ‘जुबाकु स्पेलबॉण्ड’, ‘कॅच अ वेव्ह’, ‘नोको’, ‘हारकोल स्पेस पायरेट्स’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. मात्र त्याला खरी प्रसिद्धी मिळाली ती ‘अटॅक ऑन टायटन्स’ या चित्रपटामुळे. या चित्रपटात त्याने साकारलेली ‘अॅरन जेगर’ ही भूमिका तुफान लोकप्रिय झाली. चाहते त्याला प्रेमाने अॅरन म्हणूनच हाक मारतात. चित्रपटांव्यतिरिक्त त्याने टीव्ही मालिका, रंगभूमीवरील नाटकं, वेब सीरिज, म्युझिक अल्बम यांसारख्या विविध माध्यमांमध्ये काम केलं आहे. तो एक अष्टपैलू अभिनेता होता. त्याच्या मृत्यूमुळे जपानी सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2020 7:40 pm

Web Title: attack on titan star haruma miura dies of apparent suicide mppg 94
Next Stories
1 “मला घर खर्चाला ५ कोटी लागतात, युट्यूबच्या पैशातून पाण्याचं बिलही भरता येणार नाही”
2 मनीष पॉल घेतोय अरुण गोविल यांच्याकडून धनुष्यबाण चालविण्याचे धडे!
3 हसत नाही तर रडत केली राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रचाराची सुरुवात
Just Now!
X