‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. ‘अॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर’चा हा दुसरा भाग. या चित्रपटाची सुरुवात आयर्नमॅनपासून होते. मात्र त्याचा शेवट रसिकांचं मन हेलावून टाकणारा ठरतो. याच शेवटाचा एक सीन मूळ चित्रपटातून डिलीट करण्यात आला होता. डिलीट केलेला हा सीन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘युएसए टुडे लाइफ’ या ट्विटर अकाऊंटवरून हा एक्सक्लुझिव्ह व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
या चित्रपटाच्या शेवटी मार्व्हल सिनेमॅटीक युनिव्हर्समध्ये आपण आजवर पाहिलेले सर्व सुपरहिरो एकत्रितरित्या थेनॉसविरुद्ध युद्ध करतात. या युद्धात अनेक आश्चर्यचकित करणाऱ्या घटना घडतात. ज्या घटनांची आपण कधी स्वप्नातही कल्पना केलेली नाही. परंतु प्रत्येक युद्धाची किंमत ही मोजावीच लागते या नियमाप्रमाणे अॅव्हेंजर्स फौजेलाही थेनॉस विरुद्ध पुकारलेल्या युद्धाची किंमत चुकवावी लागते. शेवटपर्यंत खिळवून ठेवणाऱ्या चित्रपटाचा शेवट चाहत्यांचं हृदय हेलावून टाकणारा आहे.
We have an EXCLUSIVE @Avengers deleted scene from #Endgame that gives fans a heroic must-see moment → https://t.co/Y0tiB90wX7 pic.twitter.com/QZDxovUCT2
— USA TODAY Life (@usatodaylife) July 26, 2019
चित्रपटातून डिलीट केलेल्या सीनमध्ये आयर्नमॅनच्या मृत्यूनंतर सर्व अॅव्हेंजर्स खाली बसून त्याला श्रद्धांजली अर्पण करतात. भावना आणि अॅक्शन ही अॅव्हेंजर्सची ताकद राहिली आहे. त्यामुळे ‘अँथोनी रूसो’ व ‘जो रूसो’ या दोन बंधू दिग्दर्शकांनी रसिकांची नस ओळखत इमोशन्स आणि अॅक्शनचा जबरदस्त डोस दिला असं म्हणायला हरकत नाही. या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर कमाईचे नवे विक्रम रचले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 29, 2019 11:59 am