माव्‍‌र्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा Avengers: Endgame हा २०१९ मधील सर्वात मोठा चित्रपट प्रदर्शित व्हायला आता केवळ दोन दिवस उरले आहेत. भारतात या बहुचर्चित चित्रपटाची अॅडव्हान्स तिकीट बुकींग सुरू झाली असून प्रत्येक १८ व्या सेकंदाला एका तिकीटाची बुकींग सुरू आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर तिकीट बुकींग सुरू असल्यामुळे लवकरच तिकीटांचा तुटवडा निर्माण होणार असल्याचे चित्र तयार झाले आहे. परंतु अशा वेळी टिकीट मिळवण्यात अयशस्वी ठरलेल्या चाहत्यांची अवस्था काय असेल याबाबत इंटरनेटवर काही मिम्स व्हायरल झाले आहेत ते असे..