छोट्या पडद्यावरील ‘बालिका वधू’ मालिकेतून प्रसिध्द झालेल्या अविका गौरने तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिलीय. ‘बालिका वधू’ या मालिकेत आनंदीची भूमिका साकारत अविका गौर घराघरामध्ये पोहचली. या मालिकेतील तिच्या अभिनयाला चाहत्यांनी मोठी पसंती दिली. आता अविका गौर तिच्या पुढच्या प्रवासासाठी सज्ज आहे. अविकाने तिच्या चाहत्यांना एक नव्हे तर दोन सरप्राईज दिले आहेत.
अविकाने स्वत:चं प्रोडक्शन हाउस सुरु केलंय. अविकाने सोशल मीडियावरुन तिच्या चाहत्यांसोबत ही बातमी शेअर केलीय. एवढचं नाही तर निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत तिनं पहिल्या सिनेमाची घोषणा केली आहे. पहिल्या तेलगू सिनेमाचं पोस्टर अविकाने शेअर केलंय. तेलगू अभिनेता साई रौनक या सिनेमातून अविकासोबत झळकणार आहे.
View this post on Instagram
“अखेर स्वप्न पूर्ण झालं. या इंडस्ट्रीने मला खुप काही दिलंय. चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहिल” असं कॅप्शन देत अविकाने तिच्या नव्या प्रवासाबद्दल चाहत्यांना सांगितलं आहे.
सोशल मीडियावरुन अविका चाहत्यांशी संवाद साधत असते. मजेशीर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत फॅन्सचं मनोरंजन करण्याचा तिचा प्रयत्न असतो. खास करुन डान्सचे अनेक व्हिडीओ अविका चाहत्यांसोबत शेअर करत असते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 17, 2021 1:48 pm