News Flash

हॉलिवूड चित्रपटाचा नव्हे हा तर ‘बागी २’चा पोस्टर

'बागी २' च्या पोस्टरमध्ये 'टर्मिनेटर', 'रॅम्बो'ची झलक दिसते.

टायगर श्रॉफच्या 'बागी २' चा पोस्टर

अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांनी बंडखोर प्रेमिकांची भूमिका साकारलेल्या ‘बागी’चा सिक्वल आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दमदार अॅक्शन दृश्यांनी परिपूर्ण अशा ‘बागी’ चित्रपटातून टायगरने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्यामुळे ‘बागी २’ च्या पोस्टर लाँचबद्दल त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली. हॉलिवूड चित्रपटांच्या तोडीसतोड असा ‘बागी २’ चा पोस्टर आहे.

‘बागी २’ च्या पोस्टरमध्ये ‘टर्मिनेटर’, ‘रॅम्बो’ची झलक दिसते. तसेच, पोस्टर बघताना अरनॉल्ड, सिल्वेस्टर स्टॅलॉनच्या हॉलिवूड अॅक्शनचीही आठवण आल्यावाचून राहत नाही. हातात मोठी बंदूक घेऊन खलनायकाशी दोन हात करण्यासाठी सज्ज झालेल्या टायगर श्रॉफची पाठमोरी झलक यात दिसते. आजवर लाखो तरुणींना घायाळ करणाऱ्या टायगरची पिळदार शरीरयष्टी यातही पाहावयास मिळते.

आधीच्या बागीमध्ये श्रद्धाची एक वेगळी बाजू पाहावयास मिळाली होती. तिनेसुद्धा चित्रपटात टायगरसोबत काही अॅक्शन दृश्ये केली होती. यासाठी तिच्यावर कौतुकाचा वर्षावही झाला होता. तसेच, दक्षिणेकडे प्रसिद्ध असलेला कलरीपयट्टू हा प्रसिद्ध मार्शल आर्ट फॉर्म पहिल्यांदाच बॉलिवूड चित्रपटात दाखविण्यात आला. ‘बाहुबली’ अभिनेता प्रभास आणि त्रिशा कृष्णन यांच्या ‘वर्षम’ या तेलगू चित्रपटावर ‘बागी २’ बनविण्यात आला आहे. आधीच्या ‘बागी’चे दिग्दर्शन शब्बीर खानने केले होते. तर ‘बागी २’चे दिग्दर्शन कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक अहमद खान याने केले आहे. चित्रपटात अॅक्शनचा पुरेपूर भरणा असल्याची ग्वाही याआधीच टायगरने सोशल मीडियावरून दिली आहे. मात्र, चित्रपटातील मुख्य नायिका आणि खलनायकाचे नाव अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे श्रद्धाच्या जागी कोणती अभिनेत्री पाहावयास मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

‘बागी २’ पुढच्या वर्षी २७ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. त्याआधी ‘मुन्ना मायकल’मध्ये टायगरच्या अफलातून डान्स मुव्ह्ज आणि स्टंट्स त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळतील. नृत्याचा देव समजल्या जाणाऱ्या मायकल जॅक्सनला टायगर या चित्रपटातून श्रद्धांजली वाहणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2017 12:14 pm

Web Title: baaghi 2 poster tiger shroff reminds you of hollywood action greats
Next Stories
1 Sarabhai vs Sarabhai Take 2 : … या तारखेला सुरु होणार साराभाई कुटुंबाची ‘क्लिन कॉमेडी’
2 PHOTOS: ‘क्वांटिको गर्ल’ची ही वेशभूषा ठरतेय चर्चेचा विषय..
3 Baahubali 2 ‘.. तेव्हा प्रभासकडे पैसे नव्हते’
Just Now!
X