बुद्धीमत्तेच्या जोरावर पैसे जिंकण्याची संधी देणारा आणि सध्याचा सर्वाधिक चर्चेतील शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती (केबीसी).’ काही दिवसांपूर्वीच केबीसी पर्व ११ ला त्यांचा पहिला कोरडपती मिळाला होता. त्यांचे नाव सरोज राज असे आहे. सरोज पाठोपाठ अमरावतीच्या बबिता ताडे करोडपती झाल्या आहेत. बबिता या पेशाने अंगणवाडी सेविका आहेत. त्या शोलेय विद्यार्थ्यांसाठी खिचडी बनवण्याचे काम करतात. त्यांना फक्त दीड हजार रुपये पगार मिळतो. केबीसीच्या माध्यमातून एक सामान्य स्त्रीसुद्धा तिचे स्वप्न पूर्ण करू शकते हे बबिता यांना सिद्ध करायचे होते आणि त्यांनी ते करून दाखवले. चला पाहूया बबिता यांचा अंगणवाडी सेविका ते करोडपती होण्याचा प्रवास…