News Flash

Box Office Collection : ‘बधाई हो’ आयुषमान; बॉक्स ऑफीसवर चित्रपटाची बक्कळ कमाई

एकाच महिन्यात आयुषमानचे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. 'अंधाधून'च्या यशानंतर आयुषचा दुसरा चित्रपट 'बधाई हो' हा देखील बॉक्स ऑफिसवर तितकाच धुमाकूळ घालत आहे.

'बधाई हो' चित्रपट या आठवड्यात ३० कोटींहून अधिक कमाई करेल असं भाकित अनेकांनी वर्तवलं आहे.

अभिनेता आयुषमान खुराना सध्या बॉलिवुडमध्ये जास्तच फॉर्ममध्ये आला आहे. एकाच महिन्यात आयुषमानचे दोन चित्रपट प्रदर्शित झाले विशेष म्हणजे ‘अंधाधून’च्या यशानंतर आयुषचा दुसरा चित्रपट ‘बधाई हो’ हा देखील बॉक्स ऑफिसवर तितकाच धुमाकूळ घालत आहे.

आयुषमानच्या ‘बधाई हो’ चित्रपटानं पहिल्याच दिवशी ७.२९ कोटींची कमाई केली आहे. विशेष म्हणजे चित्रपट एक दिवस आधी प्रदर्शित करण्याचा फंडा यशस्वी होताना दिसत आहे. दसऱ्याला हा चित्रपट प्रदर्शित झाला. याचित्रपटासमोर परिणिती- अर्जून कपूरच्या ‘नमस्ते इंग्लड’चं आवाहन होतं. मात्र आयुषमानच्या ‘बधाई हो’ चित्रपटानं पहिल्याच दिवशी ‘नमस्ते इंग्लड’ला चितपट करत विक्रमी कमाई केली आहे. ‘बधाई हो’ चित्रपट या आठवड्यात ३० कोटींहून अधिक कमाई करेल असं भाकित अनेकांनी वर्तवलं आहे.

५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेल्या आयुषमानच्या ‘अंधाधून’नं पहिल्याच आठवड्यात २७.६५ कोटींची कमाई केली होती. त्यामुळे आयुषमान स्वत:च्याच चित्रपटाचा विक्रम मोडणार का हे पाहण्यासारखं ठरेल. ज्या वयात नातवंडाना खेळवायचं त्याच वयात नकुल (आयुषमान खुराना) ची आई गर्भवती राहते. ही गोष्ट लपवताना नुकलची जी नाचक्की होते ती बधाई हो मधून पाहायला मिळत आहे. आतापर्यंत या विषयावर चित्रपट न आल्यानं प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद चित्रपटाला मिळताना दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2018 2:21 pm

Web Title: badhaai ho movie first day box office collection
Next Stories
1 ‘या’ कारणामुळे प्रियांका- निकच्या लग्नाची तारीख पुढे ढकलली
2 ‘नागिन २’मधील ही अभिनेत्री लवकरच बांधणार लग्नगाठ
3 #MeToo : ‘सेक्रेड गेम्स’च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप
Just Now!
X