अभिनेता आयुष्मान खुराना आणि ‘दंगल गर्ल’ सान्या मल्होत्रा यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या ‘बधाई हो’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर आणि दोन गाणी प्रदर्शित झाली आहे. विशेष म्हणजे ही गाणी आणि ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीत उतरले असून नुकतंच यातील तिसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
अभिनेत्री नीना गुप्ता आणि गजराज राव यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटातील ‘नैन न जोडी’ हे गाणं प्रदर्शित झालं आहे. हे गाणं आयुष्यमान आणि सान्यावर चित्रीत करण्यात आलं असून प्रेमामध्ये येणाऱ्या अडचणींवर भाष्य करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीत उतरतं असून अनेकजण या गाण्यामुळे भावनाविविश झाल्याचं पाहायला मिळत आहे.
‘नैन न जोडी’ या गाण्यापूर्वी ‘बधाइया तैनू’ आणि ‘मोरनी बनके’ ही गाणी प्रदर्शित झाली आहेत. या गाण्यांनाही प्रेक्षकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला असून हे नवं गाणं प्रेक्षकांना किती भावतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अमित रविंद्रनाथ शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट येत्या १९ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 4, 2018 1:37 pm