26 January 2021

News Flash

संगीताच्या दुनियेतला बादशहा चित्रपटसृष्टीत करणार पदार्पण

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासोबत अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

‘डिजेवाले बाबू’, ‘तारीफाँ’, ‘तम्मा तम्मा’ सारख्या गाण्यांमधून आजच्या तरुणाईच्या मनावर राज्य करणारा रॅपर, गायक बादशहा आता अभिनयातही आपलं नशीब आजमावणार आहे. बादशहा लवकरच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासोबत अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. याआधी बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांसाठी बादशहानं सुपरहिट गाणी दिली आहेत. त्यामुळे तरुणाईच्या गळ्यातील तो ताईत ठरला होता. आता बादशहानं अभिनयातही एक प्रयत्न करून पाहण्याचं ठरवलं आहे.

‘मी यापूर्वी कधीही चित्रपटात काम केलं नाही त्यामुळे मला खूपच दडपण आलं आहे. मी सारं देवावर सोडलं आहे. ‘ अशी प्रतिक्रिया बादशहानं दिली आहे. ‘लस्टस्टोरीज्’ मध्ये विकी कौशलच्या भूमिकेसाठी बादशहाला विचारण्यात आलं होतं. मात्र त्यावेळी अल्बमच्या कामात व्यग्र असल्यानं बादशहानं ‘लस्टस्टोरीज्’ ला नकार दिला होता.

माझं काम लोकांना आवडेल अशी मी अपेक्षा करतो अशीही भावना बादशहानं व्यक्त केली आहे. बादशहा, सोनाक्षीसोबतच वरुण शर्मा, अन्नू कपूरही या चित्रपटात दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2019 12:14 pm

Web Title: badshah to make debut with sonakshi sinha
Next Stories
1 खलनायकीचा प्राण
2 ठरलं तर ‘बागी ३’मध्ये हिच अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
3 Video : नेटफ्लिक्सचा पहिला ओरिजीनल मराठी चित्रपट- ‘फायरब्रँड’
Just Now!
X