सलमानच्या ‘बजरंगी’सोबत रणवीरचा ‘बाजीराव’ …. गोंधळलात ना. सध्या चर्चेत आहे तो म्हणजे सलमान खानचा ‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपट. येत्या शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित होतोय. या चित्रपटासह रणवीर सिंगच्या आगामी ‘बाजीराव मस्तानी’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात येणार आहे.
संजय लीला भन्सालीचे दिग्दर्शन असलेल्या ‘बाजीराव मस्तानी’मध्ये रणवीर, प्रियांका आणि दीपिका यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनावेळीच म्हणजेच १८ डिसेंबरला शाहरुख-काजोलचा ‘दिलवाले’ देखील प्रदर्शित होणार आहे.
समीक्षक तरण आदर्शने केलेले ट्विटः


‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाची कथा १८व्या शतकातील मराठा योद्धा बाजीराव पेशवा (रणवीर सिंग) आणि त्यांची दुसरी पत्नी मस्तानी (दीपिका पदुकोण)  यांच्यावर आधारित आहे. प्रियांकाने यात बाजीराव यांची पहिली पत्नी काशीबाई हिची भूमिका साकारली आहे.