बॉलीवूड आणि हॉलीवूड सेलिब्रिटींसाठी त्यांचे चाहते कोणत्याही थराला जायला तयार असतात. आपल्या आवडत्या कलाकाराचा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहिल्याशिवाय अनेकांना राहावत नाही. पण तुम्हाला माहित आहे का, बॉलीवूड किंवा हॉलीवूड सेलिब्रिटींसाठी चाहते जितके वेडे नसतील त्याच्यापेक्षा किती तरी पटीने तमिळ चित्रपटांचे चाहते त्यांच्या आवडत्या कलाकारांसाठी वेडे आहेत. विशेष म्हणजे त्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. सुपरस्टार रजनीकांत यांच्या चाहत्यांसाठी तर ते देवाप्रमाणे आहेत. रजनीकांतच्या फोटोला दाक्षिणात्य भागात दुग्धाभिषेकही केला जातो. मात्र, यावेळी हा जो चाहता आहे तो रजनीकांत यांच्यासाठी वेडा नाहीये.

झालं असं की, गुरुवारी तमिळ चित्रपटातील अभिनेता बालाकृष्ण याचा गौतमीपुत्र सत्कर्णी हा चित्रपट प्रदर्शित झाला. तेव्हा बालाकृष्ण याच्या चाहत्याने या चित्रपटाची तिकीट चक्क एक लाख रुपयांना विकत घेतली. गोपीचंद ईन्नमूरी असे नाव असलेला हा व्यक्ती बालाकृष्णाचा मोठा चाहता आहे. गौतमीपुत्र सत्कर्णी हा बालाकृष्ण याचा १०० वा चित्रपट असून गोपीचंद हा चित्रपट प्रदर्शित होण्याची गेल्या एक वर्षापासून वाट पाहत होता. सदर चित्रपटाची तिकीट विकत घेण्याकरिता गोपीचंद एक वर्षपासून पैसे जमा करत होता. यासाठी त्याने रोजच्या खर्चातूनही पैसे वाचविण्यास सुरुवात केली होती. पण, त्याने असे करण्यामागचे कारण जाणून तुम्हालाही त्याचा अभिमान वाटेल. अभिनेता बालाकृष्ण हा एक इंडो-अमेरिकन कॅन्सर रुग्णालय चालवतो. कॅन्सर पीडितांसाठी चालविण्यात येणा-या संस्थेला सदर चित्रपटातून मिळणा-या नफ्यातून मदत करण्याचा त्याचा उद्देश आहे. केवळ याच कारणामुळे बालाकृष्णचा चाहता असलेल्या गोपीचंदने एक लाख रुपयाचे तिकीट विकत घेतले. यातून रुग्णालयातील रुग्णांना मदत करण्यात येईल.

Ghilli re release box office collection
२० वर्षांनी सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची दमदार कमाई, दोन दिवसांत कमावले तब्बल…
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न

दरम्यान, गौतमीपुत्र सत्कर्णी या चित्रपटाने आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये कालपर्यंत १२.२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाला करमणूक करामध्ये १५ टक्क्याची सूट दिल्याचाही फायदा बॉक्स ऑफिस कमाईत झाला आहे. तेलगू चित्रपटांमध्ये सर्वाधिक कमाई करणा-या दहा चित्रपटांत गौतमीपुत्र सत्कर्णी हा आठव्या स्थानावर आहे. या चित्रपटाची कथा सातवाहन साम्राज्यातील तेलगू योद्धा गौतमीपुत्र सत्कर्णी यांच्यावर आधारित आहे. बॉलीवूड अभिनेत्री हेमा मालिनी, कबीर बेदी आणि श्रिया सरण यांच्याही चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.