News Flash

नर्गिस फाख्रीला घातला ६ लाखांचा गंडा…

या बनावट कार्डवरुन आतापर्यंत १४ वेळा व्यवहार करण्यात आला आहे.

गेले काही दिवस बऱ्याच कारणांनी चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री नर्गिस फाख्रीच्या नकळत चक्क सहा लाख रुपयांचा गंडा घातला गेला आहे. नर्गिसच्या क्रेडिट कार्डवरुन तब्बल सहा लाख रुपयांची उधळपट्टी झाली असून याबाबत ती मात्र पूर्णपणे अनभिज्ञ होती. अमेरिकेतील चेक-पाकिस्तानी वंशाच्या एका इसमाने नर्गिसचे कार्ड ब्लॉक करुन ही बाब तिच्या बॅंकेच्या आणि मुंबई पोलिसांच्या निदर्शनास आणली.
दरम्यान, सोमवारी नर्गिसच्या क्रेडिट कार्डवरुन ही उलाढाल झाली आहे. या क्रेडिट कार्डचा चुकिच्या पद्धतीने वापर करणाऱ्याने नर्गिसच्या कार्डबद्दलची माहिती मिळवून त्यानुसार एक बनावट कार्ड बनवले होते. या बनावट कार्डावरुन आतापर्यंत १४ वेळा व्यवहार करण्यात आला आहे. ज्यामध्ये नर्गिसच्या कार्डमधील ९,०६२ डॉलर्स खर्च झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी सुनिल घोसाकर यांच्या म्हणण्यानुसार कार्डचा वापर फक्त पैसे काढण्यासाठी झाला आहे. ज्यावेळी या कार्डवरुन हे व्यवहार झाले, त्यावेळी अभिनेत्री नर्गिस फाख्री मुंबईतच होती अशी माहिती मिळत आहे. या प्रकरणी तपास सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. अभिनेत्री नर्गिस फाख्री सध्या तिच्या बहुचर्चित ‘बॅन्जो’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यस्त असून या चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले आहे. ‘बॅन्जो’ या इरॉस इंटरनॅशनलच्या चित्रपटाच्या नावावरूनच हा चित्रपट संगीतप्रधान चित्रपट आहे हे लक्षात येते. ‘रॉकस्टार’ या चित्रपटानंतर संगीतप्रधान चित्रपटात काम करण्याची ही नर्गिसची दुसरी वेळ आहे. महत्वाचं म्हणजे, मुंबईच्या लालबाग भागातले हे बँजोवादक चित्रपटातदेखील ‘बॅन्जो’ वादकांच्याच भूमिकेत दिसणार आहेत. रितेश देशमुख चित्रपटात ‘बॅन्जो’ वादकाची भूमिका साकारत असून, नर्गिस डीजेच्या भूमिकेत दिसेल. या चित्रपटाबाबत सिनेरसिकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2016 1:40 pm

Web Title: banjo actress nargis fakhri credit card cloned and used in america
Next Stories
1 जॅकलिनला हवाय ‘जुडवा २’
2 ..आणि रणवीर सिंगने मारली आकाशातून उडी
3 रक्षाबंधन विशेषः मला कधीच भावाची कमतरता जाणवली नाही- सई ताम्हणकर
Just Now!
X