गेल्या १२ दिवसांपासून नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. सकाळी ८ पासून दुपारी ३ वाजेपर्यंत देशभरात शांततेच्या मार्गाने हा बंद पाळण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी पाठिंबा दिला आहे. आपण आपल्या शेतकऱ्यांसोबत उभं राहायला हवं अशी विनंती त्यांनी देशवासीयांना केली आहे.

अवश्य पाहा – “भावा तूच खरा रॉकस्टार'”; कंगनाविरुद्धच्या वादात बॉलिवूडनं दिला दिलजीतला पाठिंबा

प्रकाश राज सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. देशभरात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ते रोखठोकपणे आपली मतं मांडतात. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. “शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचायला हवा. मी भारत बंदला पाठिंबा देतोय. आपण सर्वांनी शेतकऱ्यांच्या पाठिमागे ठामपणे उभं राहायला हवं.” अशा आशयाचं ट्विट प्रकाश राज यांनी केलं आहे. त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – “याला म्हणतात आत्मसन्मान”; ते दृश्य पाहून प्रकाश राज यांनी केलं शेतकऱ्यांचं कौतुक

शेतकऱ्यांच्या आजच्या ‘भारत बंद’ला विविध संघटनांचा पाठिंबा

तीन नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला आणि मंगळवारच्या भारत बंदच्या आवाहनाला काँग्रेस पक्ष आणि बसपाने पाठिंबा जाहीर केला आहे. नागपूर शहर जिल्हा काँग्रेसने प्रदेश पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, पदाधिकारी यांनी सहाही विधानसभानिहाय आपापल्या ब्लॉकमध्ये बाजार, मोहल्ला, चौकातील दुकाने बंद करून भारत बंद यशस्वी करण्याची सूचना करण्यात आली आहे. सरकारने शेतकऱ्यांना चर्चेला बोलावले, पण एकही मागणी मान्य न करता शेतकऱ्यांचा अपमान केला. त्यामुळे बसपाने भारत बंदचे आवाहन केले असून बसपा त्याला समर्थन देत आहे, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.