प्रसिद्ध मराठी अभिनेते भारत गणेशपुरे यांचा चोरी झालेला मोबईल फोन मुंबई पोलिसांनी त्यांना परत मिळवून दिला आहे. पोलिसांनी मोबाईल चोरी करणाऱ्या एका टोळीला पकडलं आहे. या चोरांकडून तब्बल ३०० जणांचे फोन हस्तगत करण्यात आले आहेत. दरम्यान मोबईल परत मिळाल्यानंतर भारत गणेशपुरे यांनी मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत. मुंबई पोलिसांबद्दल कोणी काहीही म्हणो, पण मी पोलिसांना सलाम करतो, अशी स्तुती त्यांनी केली आहे.
अवश्य पाहा – ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; अभिनेत्री संजना गलरानीला अटक
अवश्य पाहा – “अनधिकृत बांधकाम उभारलं तेव्हा कुठे होता?”; BMCच्या कारवाईवर दिया मिर्झा संतापली
गेल्या महिन्यात मुसळधार पावसाने मुंबईला अक्षरश: झोडपून काढलं होतं. भर पावसात शूटिंगसाठी जात असताना गणेशपुरे यांना या धक्कादायक प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं. पावसामुळं रस्त्यांवर प्रचंड ट्रॅफिक होतं. या परिस्थितीचा फायदा काही चोरट्यांनी घेतला. आणि गणेशपुरे यांचा मोबाईल फोन लंपास केला होता. हा सर्व प्रसंग भारत गणेपुरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे आपल्या चाहत्यांना सांगितला. तसंच नागरिकांना देखील सतर्क राहण्याचं आवाहन केलं होतं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 10, 2020 3:18 pm