25 February 2021

News Flash

‘टॅक्सीतील प्रवाशांनी वडिलांना अपशब्द वापरले पण…’, भरत जाधवची भावूक पोस्ट

त्याची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता म्हणून भरत जाधव ओळखला जातो. नुकतीच भरतने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये वडिलांचा अपमान झाल्याचे त्याने म्हटले आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

भरत जाधवने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वडिलांसोबतचा फोटो शेअर करत ही पोस्ट लिहीली आहे. या पोस्टमध्ये त्याने, ‘एकदा आमच्या टॅक्सीत काही प्रवासी बसले होते… त्यांना नाटकाच्या प्रयोगाला जायला उशीर होत होता म्हणुन ते प्रवासादरम्यान वडिलांशी हुज्जत घालत होते. अक्षरशः आई बहिणी वरून त्यांनी शिव्या दिल्या पण वडिल त्यांना एक अवाक्षरही न बोलता त्यांना नाट्यगृहावर सोडलं आणि शांतपणे निघून आले. रात्री घरी आल्यानंतर त्यांनी हा प्रसंग सांगितला’ असे म्हटले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)

पुढे तो म्हणाला, ‘ते प्रवासी ‘ऑल द बेस्ट’ च्या प्रयोगाला चालले होते! आपल्या मुलाच्या नाटकासाठी लोकं गर्दी करतायत. या एकाच गोष्टीसाठी त्यांनी तो अपमान मुकाट सहन केला. खुप रडलो होतो त्या दिवशी. सुदैवाने तेंव्हा मला १०० रुपये नाईट मिळत होती.. त्या दिवसापासून त्यांना टॅक्सी चालवणं आता बंद करा म्हणून सांगितलं. टॅक्सी चालवणं त्यांनी बंद केलं तरी ती टॅक्सी त्यांनी विकली नाही कारण त्यांना चिंता होती उद्या जर ह्याचं एखादं नाटक नाही चाललं तर काय करणार. ज्या वेळेस मी पहिली लक्झरी कार ऑटोमॅटिक Honda Accord घेतली आणि त्यांना स्टीअरिंग वर बसवलं त्यावेळेस आम्हा दोघांनाही खुप भरून आलं होतं. त्यानंतर मी अनेक लक्झरी गाड्या घेतल्या.. BMW, Mercedes S Class.’

‘मला आनंद या गोष्टीचा आहे की त्यांच्या हयातीतच मी मला जेवढं शक्य होत ते सगळं सुख त्यांना देऊ शकलो.अर्थात त्यांच्या आशीर्वादाच्या पाठबळावरच मी हा प्रवास केलाय. आजही माझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये आमच्या त्याच टॅक्सीचा फोटो मी लावलेला आहे. अण्णा… आज तुम्हाला खुप मिस करतोय. तुमच्या सारखा देव माणुस मी आयुष्यात पाहिला नाही..’ असे भरत पुढे म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2021 4:18 pm

Web Title: bharat jadhav emotional post for father avb 95
Next Stories
1 इंडियन आयडॉल 12 : सुभाष घईंनी अरुणीताला दिला लाखमोलाचा सल्ला
2 Video: गायिका प्रियांका बर्वेच्या चिमुकल्याची कमाल; आईला दिली गाण्यात साथ
3 खऱ्या आई-वडिलांविषयी जाणून घेण्याची इच्छा आहे का? सुष्मिताच्या मुलीला प्रश्न विचारताच म्हणाली..
Just Now!
X