राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा उपद्रव झाल्यानंतर मोठ्या संख्येनं रुग्णवाढ झाली. त्यामुळे बेड, व्हेंटिलेटर, आयसीयू बेडबरोबरच रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्यात १५ दिवसांची संचारबंदी जाहीर करण्यात आली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे. दरम्यान कॉमेडियन भारती सिंहने देखील लोकांना तोंडाला मास्क लावण्याचे आवाहन केले आहे. पण त्याचवेळी भारतीने स्वत: मास्क लावले नसल्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर भारती सिंहचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये भारतीने गुलाबी रंगाचा फ्लोरल ड्रेस परिधान केला आहे. या लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

व्हिडीओमध्ये भारतीने तोंडाला मास्क लावलेले नाही आणि ती दुसऱ्यांना मास्क लावण्यासाठी सांगताना दिसत आहे. पण जेव्हा भारतीच्या लक्षात आले की तिने स्वत: मास्क लावलेला नाही तेव्हा ती ड्रेसने तोंड झाकण्याचा प्रयत्न करते. व्हिडीओमध्ये भारती बोलताना दिसत आहे की, ‘मास्क लावा सगळ्यांनी, ओह सॉरी मी स्वत: लावलेले नाही.’

भारतीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी तिला मास्क न लावल्याने ट्रोल केले आहे. काही लोकांनी हसण्याचे इमोजी वापरले आहेत. तर काहींनी तिला चांगलेच सुनावले आहे. एका यूजरने तर ‘नशा उतरा नही अब तक’ असे म्हणत सुनावले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने अशा लोकांमुळेच लॉकडाउन करण्याची गरज भासली आहे असे म्हटले आहे.