01 March 2021

News Flash

‘हा’ व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल भाऊ कदम रॉक्स!

व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू येईल

सगळी दु:ख विसरुन सर्वांना खळखळून हसायला लावणारा झी मराठी वाहिनीवरील कार्यक्रम म्हणजे ‘चला हवा येऊ द्या.’ या कार्यक्रमामधून अभिनेते भाऊ कदम आणि अभिनेत्री श्रेया बुगडे घराघरात पोहोचले आहेत. त्यांनी त्यांच्या विनोदाने अनेकांच्या मनावर जाणू काही जादूच केली आहे. भाऊ कदम आणि श्रेया बुगडे हे विनोदवीर सध्याचे चर्चेतील विषय लोकांसमोर अशा प्रकारे सादर करताता की लोकांना पोट धरुन हसू येते. नुकताच भाऊ कदम यांचा ‘चला हवा येऊ द्या’मधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

झी मराठीने त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर भाऊ कदम यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये भाऊ कदम यांचे काही निवडक हास्यक्षण दाखवण्यात आले आहेत. भाऊ कदम यांचे विनोद ऐकून शोमध्ये हजेरी लावणाऱ्या पाहुण्यांना देखील हसू अनावर झाल्याचे पाहायला मिळते.

काही दिवसांपूर्वी भाऊ कदम उर्फ भालचंद्र कदम यांनी त्यांच्या मोठ्या भावासोबतचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोवर अनेकांनी ‘जुडवा’, ‘सेम-टू-सेम’ अशा प्रतिक्रिया दिल्या होत्या. भाऊ कदम यांना तीन मुली आहेत. ते त्यांच्या व्यग्र वेळपत्रकातून वेळ काढून पत्नी ममता आणि मुली मृण्मयी, संचिती, समृद्धी यांना वेळ देत असतात. इतके यश, लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळूनही भाऊ कदम यांच्यामधील साधेपणा आजही कायम आहे. त्यामुळेच साधे राहणीमान, कामावरील श्रद्धा आणि कुटुंबावरील जीवापाड प्रेम यामुळे भाऊ कदम रसिकांचे लाडके बनले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2019 10:21 am

Web Title: bhau kadam make you laugh in this video must watch video avb 95
Next Stories
1 ‘दबंग ३’ सुपरफ्लॉप म्हणत केआरकेची सलमानवर टीका
2 पोल डान्समुळे ‘ही’ मराठमोळी आली होती चर्चेत
3 सलमानचा आवाज, चुलबुलचा कडक अंदाज; ‘दबंग-३’ मधील गाण्याचा टिझर रिलीज
Just Now!
X