अभिनयासोबतच आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे भूमी पेडणेकर. ‘दम लगाके हैशा’ या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण करणारी भूमी सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. अनेकदा फोटो, व्हीडओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे अनेक वेळा ती चर्चेचा विषय ठरते. त्यातच आता भुमीने एका नवा फोटो शेअर केला असून ती सध्या चर्चेत आली आहे.

भूमीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती फ्रेश मूडमध्ये असल्याचं दिसून येत आहे. या फोटोमध्ये तिने अत्यंत कमी मेकअप केला असून पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. सारं काही आनंद आणि सुखासाठी goodmorning #familia.” अशा आशयाचं कॅप्शन भूमीने या फोटोला दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

All about happiness & joy #goodmorning #familia

A post shared by Bhumi (@bhumipednekar) on

दरम्यान, भूमी बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती तिच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त असून लवकरत बधाई हो च्या पुढील भागात झळकणार असल्याचं सांगण्यात येत आहे.