News Flash

Bigg Boss 11: अर्शी खान खोटारडी, तिच्या आईनेच केला खुलासा

अर्शी पब्लिसिटीसाठी काहीही करु शकते

‘बिग बॉस’ सीझन ११ ची स्पर्धक अर्शी खानमुळे दरदिवशी नवे वाद पाहायला मिळत आहेत. कधी अर्शीमुळे तर कधी हिना खानमुळे घर नेहमीच वादांमध्ये अडकलेले असते. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या एका भागात अर्शीने तिचे आजोबा चरित्र्यहिन असल्याचे म्हटले होते. मुळचे अफगाणिस्तानातले असलेल्या आपल्या आजोबांना चरित्रहिन म्हणत त्यांनी १८ लग्न केल्याचेही ती म्हणाली होती. पण हे सत्य नसल्याचे अर्शी खानच्या आईचे म्हणणे आहे.

‘दैनिक भास्कर’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, अर्शीचे आजोबा अफगाणिस्तानातील नव्हते. तसेच त्यांनी १८ लग्नही केली नाहीत. अर्शीच्या वडिलांनी सांगितल्यानुसार, त्यांच्या बाबांची फक्त दोन लग्ने झाली होती आणि इंग्रजांच्या काळात ते भोपाळ सेंट्रल जेलचे जेलर होते.
आजोबांनी १८ लग्न केली या अर्शीच्या म्हणण्यावर तिची आई म्हणाली की, अर्शी पब्लिसिटीसाठी काहीही करु शकते. ती माध्यमांचं लक्ष स्वतःकडे वळवण्यासाठी कुटुंबाचे नावही बदनाम करु शकते. ती प्रसिद्ध होण्यासाठी कितीही खोटं बोलू शकते.

एकीकडे तिच्या आईने आजोबांबद्दलचे तिचे विधान खोटे ठरवले, तर दुसरीकडे तिच्या वयाबद्दलही अनेक संभ्रम आहेत. तिने बिग बॉसच्या घरात तिचे वयही कमी सांगितले. ती २६ वर्षांची असल्याचे तिने सांगितले पण तिचे खरे वय ३१ वर्षे आहे. भोपाळमधील ‘मेयो कॉलेज’मध्ये तिने आपले योग्य वय सांगितले होते. तिचा जन्म २९ जुलै १९८६ मध्ये झाला असून, ती ३१ वर्षांची आहे.

याआधीही तिने चर्चेत येण्यासाठी अनेकदा खोटे बोलल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीसोबत लग्न झाल्याचे तिने म्हटले होते. एवढेच नाही तर ती त्याच्या मुलाची आई होणार असल्याचाही तिने दावा केला होता. अर्शीच्या या विधानामुळे शाहिदला खुलासा करावा लागला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2017 5:39 pm

Web Title: big boss 11 arshi khan lie caught on grandfather marriage
Next Stories
1 पुन्हा एकदा कपड्यांवरुन चर्चेत आली विद्या बालन
2 मिस वर्ल्ड मानुषीवर होणार ‘या’ बक्षिसांची बरसात?
3 पद्मावती वाद: ‘अमिताभ, आमिर, शाहरुख, मोदीचे मौन का?’
Just Now!
X