03 March 2021

News Flash

फेसबुकवर व्हिडिओ शेअर करुन ‘बिग बॉस कन्नड’ विजेत्याचा आत्महत्येचा प्रयत्न

मित्राच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे प्रथमने म्हटले आहे.

'बिग बॉस कन्नड'४ चा विजेता प्रथम

‘बिग बॉस कन्नड’ या स्पर्धेच्या चौथ्या हंगामातील विजेता ठरलेल्या प्रथमने आत्महत्या करण्याचा प्रयत्न बुधवारी केला. प्रथमने बुधवारी रात्री बंगळुरुमधील राहत्या घरात झोपेच्या गोळ्या घेऊन आयुष्य संपविण्याचा प्रयत्न केला. त्याने फेसबुकवर लाइव्ह व्हिडिओ शेअर करत आयुष्याला कंटाळल्याचे सांगत आत्महत्येचे कारण सांगितले होते. त्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मित्रामुळे आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाल्याचे त्याने म्हटले आहे.

pratham-759-2

‘बिग बॉस कन्नड’ या लोकप्रिय स्पर्धेच्या विजेत्या प्रथमने त्याच्या मित्रावर त्रास देणे तसेच त्याच्या नावाचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. प्रथमेशने फेसबुकवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले की, “मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करेन असे कधीही वाटले नव्हते. पण या लोकांनी माझे जगणे मुश्किल केले. त्यामुळे जीवन संपवूनच मला शांती मिळू शकते.” या व्हिडिओतून प्रथमने प्रसारमाध्यमांवरही आरोप केला आहे. स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी त्याने मिळणारे बक्षिस दान करणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर विजेता ठरल्यानंतर त्याला अनेकदा रक्कम दान केल्या नसल्याबद्दल विचारण्यात आले. यासंदर्भातही त्याने व्हिडिओतून स्पष्टीकरण दिले आहे. ‘बिग बॉस कन्नड’ विजयानंतर मिळणारी रक्कम मला आता मिळाली आहे. मिळालेला एकही पैसा मला माझ्याकडे ठेवायचा नाही. फेसबुकवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याने चेकबुक आणि पासबुकसुद्धा दाखविले आहे. मी हा तणाव आता सहन करु शकत नाही. माझ्यामुळे कुणाला त्रास झाला असेल तर माफ करा, असे त्याने व्हिडिओमध्ये म्हटले होते.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, घटनेनंतर प्रथमला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर सध्या उपचार सुरु असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. प्रथमच्या या कृत्याला सोशल मीडियावर काहीजण प्रसिद्धीसाठी केल्याच्या प्रतिक्रिया देखील उमटताना दिसते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2017 11:39 am

Web Title: big boss kannada winner pratham attempts suicide and share video on facebook
Next Stories
1 आजारपणामुळे खंगलेल्या विनोद खन्नांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल
2 ‘आयपीएल’मध्ये ठुमके लावणाऱ्या अॅमीवर टीका
3 माझा किताबखाना : विचारांना कलाटणी देणारं ‘द माँक व्हू सोल्ड हीज फेरारी’
Just Now!
X