कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये गेले ५० दिवस स्पर्धक राहत आहेत. कुठल्याही प्रकारची बाहेरच्या विश्वातील माहिती त्यांच्यापर्यंत पोहचत नाही. तसेच इतक्या दिवसांपासून त्यांचा बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीशी संपर्क नाही. त्यामुळे २४ तास ते फक्त घरातील सदस्यांशी बोलतात, भांडतात, भावना व्यक्त करतात.

घरामध्ये करमणुकीचे कुठलेही साधन नाही, त्यामुळे घरातील सदस्य रोज काही ना काही करमणुकीचे साधन शोधत असतात. करमणुकीच्या साधनांपैकी एक साधन म्हणजे या घरामध्ये असलेले कॅमेरा जे सदस्यांवर २४ तास नजर ठेऊन असतात. जणू हे सदस्य त्यांच्या नजर कैदेतच आहेत.

https://www.voot.com/shows/bigg-boss-marathi-s01/1/596072/bhushan-s-dabholkar-joke/601757

काही दिवसांपूर्वी जुई गडकरी बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडली. तिने घरातील कॅमेऱ्यांना दिलेल्या नावांबद्दल खुलासा केला. आम्ही घरातील कॅमेरांना वेगवेगळी नावे ठेवली होती, कारण आम्ही जेव्हा त्यांच्याशी बोलायचो तेव्हा ते आमच्याकडे पाहायचे, पॅन, फोकस, झूम करायचे त्यामुळे छान वाटायचे. दाभोळकर, साळुंखे, डिसुजा, कधी काका- काकू असे देखील आम्ही त्यांना प्रेमाने म्हणायचो.

https://www.voot.com/shows/bigg-boss-marathi-s01/1/596072/resham-interacts-with-dabholkar/606531

जुईने घरात राहण्याचा अनुभवही कथित करत म्हटले की, ‘बिग बॉस मराठीच्या घरामध्ये मी १५ वेगळ्या स्वभावाच्या माणसांबरोबर राहिले. त्यामुळे आता मी माणसांमध्ये सहज राहू शकते. पहिले मला माणसांपेक्षा प्राणी आवडायचे, मी प्राणी प्रेमी आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये राहून आल्यावर मी पहिल्यापेक्षा जास्त शांत झाले आहे. तसंच जगणं आवडू लागले आहे असे मी म्हणेन.’