News Flash

‘पोरस’, ‘महाकाली’ मालिकांच्या सेटला आग, संपूर्ण सेट जळून खाक

सेटवर पीओपी आणि प्लॅस्टिकचे मोठं काम असल्याने शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्रथम अंदाज वर्तवण्यात येत आहे.

महाराष्ट्र- गुजरात सीमेनजीकच्या उंबरगावमधील देहरी येथील वृंदावन स्टुडिओला आज सकाळी भीषण आग लागली. या आगीत सोनी टीव्हीवरील ‘पोरस’, ‘महाकाली’, ‘शनिदेव’ या मालिकांचा सेट जळून खाक झाला आहे. संपूर्ण सेट जळून खाक झाल्याने निर्मात्यांचे यात कोट्यवधीचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आगीत जीवितहानी झाली नसली तरी स्टुडिओचं फार नुकसान झालं आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अजून स्पष्ट झालेले नसून लवकरच यासंदर्भातही अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती मिळेल. पण सेटवर पीओपी आणि प्लॅस्टिकचे मोठं काम असल्याने शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्रथम अंदाज वर्तवण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2018 1:40 pm

Web Title: big fire in vrindavan studio porus mahakali serial set got fire near maharashtra gujrat border
Next Stories
1 ‘राजी’च्या यशानंतरही मेघना गुलजार यांच्या डोळ्यात पाणी !
2 VIDEO : KKRच्या परदेशी खेळाडूंना शाहरुखची डायलॉगबाजी ऐकवली तेव्हा…
3 ‘या’ मराठी नाटकाच्या ७०० व्या प्रयोगाला असणार आमिर खान आणि नागराज मंजुळे यांची उपस्थिती
Just Now!
X