News Flash

Video : …जेव्हा जस्लीन सावरते अनुप जलोटा यांची बाजू

जस्लीनने अनुपजींची बाजू सावरत सृष्टीला खडे बोल सुनावले आहेत.

अनुप जलोटा-जस्लीन मथारू

प्रसिद्ध भजन गायक अनुप जलोटा आणि जस्लीन मथारु यांच्यामुळे बिग बॉसचं १२ वं पर्व गाजण्यास सुरुवात झाली आहे. बिग बॉसच्या घराबाहेर अनुप-जस्लीनच्या नात्याची जोरदार चर्चा सुरु असून आता घरामध्येही त्यांच्या नात्याची चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. याचा प्रत्यय नुकताच आला असून घरामध्ये जस्लीन अनुपजींची बाजू सावरताना दिसून आली.

बिग बॉसचं १२ वं पर्व आता खऱ्या अर्थाने सुरु झालं असून पहिल्याच नॉमिनेशन टास्कमध्ये घरातल्या सदस्यांनी अनुप जलोटा आणि जस्लीन मथारु यांच्या नात्याविषयी काही प्रश्न उपस्थित केले. त्याबरोबरच पहिल्या नॉमिनेशनसाठी घरातल्या अन्य सदस्यांनी अनुपजी यांच्या नावाला पसंती दिल्याचं दिसून आलं.
‘विचित्र जोडी’ या संकल्पनेवर आधारित असलेल्या पर्वामध्ये खेळण्यास अनुप जलोटा सक्षम नसल्याचं त्यांची प्रतिस्पर्धक सृष्टीने म्हटलं आहे. सृष्टीच्या या विधानावर जस्लीनने अनुपजींची बाजू सावरत सृष्टीलाच खडे बोल सुनावले आहेत.

 

View this post on Instagram

 

Srishty targets Anup and Jasleen Day 01: It may just be the first day, but Srishty Rode is already at odds with Anup Jalota and Jasleen Matharu. While she points out that Anup is too old for the game, Jasleen jumps to his rescue and calls Srishty immature. Is this the first fight of the season? Watch this highlight to find out, on Voot Follow @biggboss12.fanpagee Follow @biggboss12.fanpagee Follow @biggboss12.fanpagee #bb12 #bigboss12 #bb #salmankhan #colorstv #dipikakakar #srishtyrode #karanvirbohra #nehhapendse #sreesanth #AnupJalota #JasleenMatharu #KritiVerma #RoshmiBanik #RomilChaudhary #NirmalSingh #SourabhPatel #ShivashishMishra #SabaKhan #SomiKhan #DeepakThakur #UrvashiVani #HinaKhan #shilpashinde #manveergurjar #priyanksharma #vikasgupta  #mumbai  #divyaagarwal

A post shared by Biggboss season 12 (@biggboss12.fanpagee) on

‘बिग बॉसच्या घरामध्ये हळूहळू कठीण टास्क देण्यात येतात. त्यामुळे अनुपजींचं वय पाहता त्यांना हे टास्क करणं पुढे शक्य होणार नाही. जस्लीन-अनुप यांच्या जोडीत केवळ जस्लीन एक स्ट्राँग स्पर्धक आहे. पण अनुपजी पुढे शारीरिक समस्यांना समोरं जावं लागू शकतं त्यामुळे त्यांना नॉमिनेट करण्यात यावं’, असं सृष्टीने म्हटलं होतं. त्यावर जस्लीनने सृष्टीला प्रत्युत्तर देत ती बालिश असल्याचं म्हटलं आहे.

‘मला असं वाटतंय जी व्यक्ती या घरात येण्यास सक्षम आहे अशाच व्यक्तींची बिग बॉसने निवड केली आहे. त्यामुळे जर कोणाला असं वाटत असेल की अनुपजी या घरात राहण्यास सक्षम नाहीत तर ती त्यांच्या विचारांची अपरिपक्वता आहे’. ‘तर मी शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे म्हणूनच या घरामध्ये माझी निवड झाली आहे’, असं अनुपजी म्हणाले.

दरम्यान, अनुप जलोटा यांच्यामुळे प्रकाशझोतात आलेली जस्लीन २८ वर्षांची असून ती मूळची कोलकाताची आहे. गायनात रुची असलेल्या जस्लनीने वयाच्या ११व्या वर्षापासून गायनाचे प्रशिक्षण घेतल असून अनुपजींकडेही तिने गायनाचे धडे गिरविली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2018 2:23 pm

Web Title: bigg boss 12 anup jalota jasleen matharu relationship status srishty rode viral video
Next Stories
1 Koffee With Karan Season 6 Promo : सेलिब्रिटींना करावा लागणार करणच्या चुकीच्या प्रश्नांचा सामना 
2 वयाच्या पाचव्या वर्षापासून प्रियांकाला अस्थमाचा त्रास
3 डॉल्फिनसोबत फोटो काढणं त्रिशाला पडलं महाग
Just Now!
X