छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो ‘बिग बॉस’च्या १३ व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा लवकरच रंगणार आहे. त्यामुळे यंदाच्या पर्वात कोणता स्पर्धक विजयी होईल ही उत्सुकता प्रत्येकालाच आहेत. त्यातच विकेंडचा डाव कायमच प्रेक्षकांसाठी उत्सुकता वाढविणारा ठरतो. यावेळीदेखील बिग बॉसच्या घरातला यंदाचा विकेंड डाव स्पर्धकांसाठी आणि प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे. या विकेंडला ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता येणार असून सोबत त्या सलमानसाठी एक खास गिफ्ट आणणार आहेत. त्यामुळे हे गिफ्ट नक्की काय असेल याविषयीची चाहत्यांमध्ये उत्सुकता असल्याचं दिसून येत आहे.
नीना गुप्ता यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत, ‘मी लवकरच येत आहे बिग बॉसच्या मंचावर. सलमान भाईसाठी काही तरी खास घेऊन’, असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं.
“नटूनथटून मी बिग बॉसच्या घरात जाणार आहे. मी पार्लरमध्ये गेल्यानंतर तिथल्या मुलींनी आणि माझ्या घरातल्या सर्व मुलींनी मला प्रेमाने मिठी मारली. तुम्ही सलमानला भेटल्यानंतर आमच्याकडून त्याला प्रेमाने मिठी मारा आणि आमची प्रेमाची मिठी त्याच्यापर्यंत पोहोचवा, असं या मुलींनी मला सांगितलं. त्यामुळे सलमानजी या सगळ्यांची प्रेमाची मिठी घेऊन मी लवकरच येत आहे”, असं नीना यांनी व्हिडीओमध्ये सांगितलं.
वाचा : अध्ययन सुमनच्या गर्लफ्रेंडने शेअर केला टॉपलेस फोटो
दरम्यान, नीना गुप्ता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर अॅक्टीव्ह असून बऱ्याचदा कलाविश्वात घडणाऱ्या गोष्टींवर व्यक्त होत असतात. लवकरच त्या सूर्यवंशी आणि शुभ मंगल ज्यादा सावधानमध्ये झळकणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 8, 2020 1:27 pm