17 January 2021

News Flash

‘बिग बॉस’मध्ये पहिल्यांदाच सलमान झाला भावूक, पाहा व्हिडीओ

सलमान खान पहिल्यांदा कोणता तरी स्पर्धक घरी जाताना पाहून रडला आहे.

सलमान खान

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणजे ‘बिग बॉस.’ बॉलिवूडचा भाईजान सलामान खान सूत्रसंचालन करत असलेल्या बिग बॉसचे १४ वे पर्व सध्या चर्चेत आहे. प्रत्येक आठवड्याला या शोमधून कोणता तरी स्पर्धेक हा घरी जात असतो. या शोच्या आगामी एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. कारण सलमान खान पहिल्यांदा कोणता तरी स्पर्धक घरी जाताना पाहून रडला आहे.

नुकताच कलर्स वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या भागात रूबीना दिलैक-अभिनव शुक्ला, जास्मिन भसीन-अली गोनी हे गार्डन एरियात असल्याचे दिसते. हे चौघे एकमेकांना निरोप देत रडत असल्याचे दिसते. अभिनव आणि जास्मिनला सलमान पुढे यायला सांगतो. ते दोघ रेड बॉक्समध्ये असतात. सलमान त्यांची माफी मागतो आणि पहिल्यांदा सलमान कॅमेरासमोर रडतो. तर बाकी सगळे स्पर्धेक हे घरात असतात. या दोघांपैकी एकाला घरी जातान पाहून विकास गुप्ता, राहूल वैद्य आणि राखी सावंत यांनाही रडू येते.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

आणखी वाचा : हृतिकच्या वाढदिवसानिमित्त सुझानने शेअर केला खास व्हिडीओ, म्हणाली…

दरम्यान, या सोबत आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत सलमान बिग बॉसच्या घरात जाऊन साफसफाई करताना दिसत असल्याचे पाहायला मिळते. मात्र त्याने कोणतेही काम छोटे नाही असे म्हटले आहे. सध्या भाईजानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून अनेकांनी कमेंट करत सलमानचे कौतुक केले आहे. बिग बॉसच्या १३ व्या पर्वातही सलमानने बिग बॉसच्या घरात भांडी धुतली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2021 3:11 pm

Web Title: bigg boss 14 for the first time in bigg boss history salman cried because the contestant was leaving dcp 98
Next Stories
1 हृतिकच्या वाढदिवसानिमित्त सुझानने शेअर केला खास व्हिडीओ, म्हणाली…
2 ‘सख्खे शेजारी’ या तारखेपासून प्रेक्षकांच्या भेटीला
3 करीनामुळे ‘आदिपुरूष’चे चित्रीकरण लांबणीवर?
Just Now!
X