‘बिग बॉस’ हा नेहमीच वादग्रस्त व चर्चेत राहिलेला रिअॅलिटी शो आहे. सध्या या शोचा चौदावा सिझन सुरू असून त्यातील स्पर्धक निक्की तांबोळी ही सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात दिल्या गेलेल्या टास्कदरम्यान निक्कीने केलेलं कृत्य पाहून अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे. इतकंच नाही तर घरातील इतर सदस्यसुद्धा तिच्यावर नाराज झाले आहेत.

नेमकं काय घडलं?
नॉमिनेशन टास्कदरम्यान स्पर्धकांना एकमेकांचा मास्क लपवण्याचा टास्क देण्यात आला होता. यावेळी राहुल वैद्यने आपला मास्क हिसकावून घेऊ नये म्हणून निक्की तांबोळीने चक्क तिच्या पँटमध्ये मास्क लपवला. इथवरच न थांबता, मास्क हिसकावून दाखव, असं म्हणत तिने राहुलला डिवचलं. तिच्या या कृत्यामुळे घरातील सदस्य व नेटकरी तिच्यावर चांगलेच संतापले आहेत. या कृत्यानंतर राहुलने निक्कीला ‘गटार’ म्हणत तिच्यावर टीका केली. सदस्यांच्या टीकेने काहीच फरक पडत नसल्याचा आव आणत युद्धात आणि प्रेमात सर्वकाही माफ असतं या नियमाने निक्की टास्क जिंकण्याचा प्रयत्न करते.

निक्कीचं हे वागणं अत्यंत खालच्या दर्जाचं असल्याची टीका पवित्रा पुनियाने केली. इतरही सदस्यांनी तिच्यावर आक्षेप घेतला. तर दुसरीकडे बिग बॉसने निक्की नॉमिनेशन प्रक्रियेतून बचावल्याचं घोषित केलं आणि राहुल वैद्य रेड झोनमध्ये गेला.