03 March 2021

News Flash

बिग बॉस ७: कुशालने दिली प्रेमाची कबुली

बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये कुशाल टंडन आणि गौहर खान खूप चांगले मित्रमैत्रीण असल्याचे दाखवत आले आहेत.

| November 29, 2013 07:40 am

बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये कुशाल टंडन आणि गौहर खान खूप चांगले मित्रमैत्रीण असल्याचे दाखवत आले आहेत. पण, कुशालने बिग बॉसच्या घरात पुर्नपदार्पण केल्यापासून हे दोघेहीजण अधिक जवळ आल्याचे चित्र पाहावयास मिळते.
बिग बॉसने दिलेल्या किसको प्यार करू टास्कमध्ये एजाज आणि कुशालला गौहरचे हृदय जिंकण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करायची होती. यात त्यांना गौहरसाठी असलेले प्रेम व्यक्त करायचे होते. या टास्कवेळी, कुशालने हा टास्क जिंकू किंवा नाही पण संपूर्ण जग, त्याचे कुटुंब, मित्रमैत्रीण यांच्यासमोर गौहरवर असलेल्या प्रेमाची कबुली देण्याची इच्छा व्यक्त केली.


कुशाल म्हणाला की, माझे गौहरवर खूप प्रेम आहे. हे ऐकून भावनिक झालेल्या गौहरचे डोळे पाणावले. यावेळी एजाजनेही गौहरवर असलेल्या त्याच्या प्रेमाची कबुली दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2013 7:40 am

Web Title: bigg boss 7 kushal confesses his love for gauahar says wants to grow old with her
Next Stories
1 यशराजचा ‘गुंडे’ बंगालीतही
2 स्टिवन स्पिलबर्गच्या चित्रपटात जुही
3 परिणीतीचा आगामी चित्रपट हुंडा प्रथेवर आधारित
Just Now!
X