News Flash

बिग बॉस ७- तनिषा-अरमानचं चाललयं काय?

बिग बॉसच्या घरातील स्पर्धक बॉलीवूड अभिनेत्री तनिषा आणि अरमान यांच्यातील वाढत्या मैत्रीची चर्चा सध्या चालू आहे.

| November 22, 2013 12:02 pm

बिग बॉसच्या घरातील स्पर्धक बॉलीवूड अभिनेत्री तनिषा आणि अरमान यांच्यातील वाढत्या मैत्रीची चर्चा सध्या चालू आहे. मात्र, या दोघांमधील मैत्री काही वेगळेच रूप आता घेऊ लागली आहे. हे दोघेही कॅमे-यासमोर आपत्तीजनक अवस्थेत पाहिले गेले आहेत.
कलर्स वाहिनीच्या अधिकृत वेबसाइटवर तनिषा-अरमान हे आपत्तीजनक अवस्थेत दिसले. हा भाग प्रेक्षकांना दाखविण्यात आला नाही. पण, शोचे लाइव्ह शूट करणारे हे दृश्य पाहून चकित झाले. यापूर्वीही या दोघांना एकत्र पकडले गेले होते. मध्यरात्री एकमेकांना किस करताना हे दोघे आढळले होते. त्यावेळेस इतर सदस्य त्याच रुममध्ये झोपलेले होते.
शोचा होस्ट सलमान खानने ही एकदा बिग बॉसच्या एका भागामध्ये तनिषाला सतर्कतेचा इशारा दिला होता की, ‘बिग बॉसच्या घरात तुम्ही जे काही करता, त्यावर ८४ कॅमेरांचे लक्ष असते, जो तुमच्या प्रत्येक हरकतीवर आणि प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवून असतो.’
तसेच, तनिषाची बहिण आणि अभिनेत्री काजोल, अजय देवगण हे तिला बिग बॉसमधून लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी सलमानवर दबाव टाकत असल्याची अफवा चालू आहे. आता तर कुशलही बिग बॉसच्या घरात परतला आहे. त्यामुळे, या घरात पुढेही बरचं काही घडण्याची शक्यता दर्शविणे चुकीचे ठरणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2013 12:02 pm

Web Title: bigg boss 7 tanishaa armaan get intimate kushal returns
Next Stories
1 जगण्यातला सूर ढळू न देणारा ‘सूर राहू दे’
2 फिल्मी मॉल
3 सैफ बॉलीवूड चित्रपट पाहत नाही- करिना
Just Now!
X