10 April 2020

News Flash

रुपालीला विसरुन पराग पडला ‘या’ व्यक्तीच्या प्रेमात

बिग बॉसच्या घरात पराग आणि रुपालीकडे लव्हबर्ड्स म्हणून पाहिलं जायचं, पण...

छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ मराठीचं दुसरं पर्व चांगलंच गाजलं होतं. या पर्वामध्ये पराग कान्हेरे आणि रुपाली भोसले यांच्याकडे लव्हबर्ड्स म्हणून पाहिलं जात होतं. बऱ्याच वेळा परागने रुपालीप्रतीच्या प्रेमाची कबुली दिली होती. मात्र रुपालीने कायम आपण चांगले मित्र असल्याचं म्हटलं होतं. विशेष म्हणजे त्यांची चर्चा केवळ घरातचं नाही तर चाहत्यांमध्येही चर्चा रंगली होती. मात्र या शो संपल्यावर त्यांच्या चर्चाही कमी झाल्या. परंतु आता पुन्हा एकदा परागच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. परागने स्वत: इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्याच्या प्रेमाची कबुली दिली आहे.

परागने इन्स्टाग्रामवर व्हॅलेंटाइन डे च्या सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले असून या फोटोमध्ये त्याची प्रेयसीदेखील दिसून येत आहे. मुक्ता भातखंडे असं त्याच्या प्रेयसीचं नाव असून हा फोटो शेअर करत त्याने प्रेमाची कबुली दिली आहे.

 

View this post on Instagram

 

@muktabhatkhande – lovely photos…thank U

A post shared by Chef Parag Kanhere (@paragkanhere) on

“होय, मी प्रेमात आहे. आता सगळी शस्त्र खाली टाकून आयुष्यभरासाठी मी तुझा होत आहे, असं म्हणत, परागने मुक्ताप्रतीचं प्रेम व्यक्त केलं आहे. बिग बॉस २ हे पर्व चांगलंच गाजलं होतं. या पर्वामुळे परागला प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. मात्र शोदरम्यान, नेहा शितोळेसोबत केलेल्या गैरवर्तणुकीमुळे त्याला हा कार्यक्रम मध्येच सोडावा लागला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2020 12:47 pm

Web Title: bigg boss marathi 2 fame chef parag kanhere confess love relationship with mukta bhatkhande ssj 93
Next Stories
1 ‘तान्हाजी’ चित्रपट पाहून हृतिक रोशन म्हणाला..
2 Video : डॉ. अमोल कोल्हेंनी उलगडली ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेसोबत झालेल्या राजकारणाची गोष्ट
3 कियारा आडवाणीचं टॉपलेस फोटोशूट; फोटो व्हायरल
Just Now!
X