‘बिग बॉस मराठी’चे दुसरे पर्व नुकतेच सुरू झाले असून रविवारी या कार्यक्रमाचा ग्रँड प्रिमिअर सोहळा पार पडला. दुसऱ्या पर्वात कोणकोणते सेलिब्रिची सहभागी होतील याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. १५ स्पर्धकांनी रविवारी बिग बॉसच्या घरात प्रवेश केला. ग्रँड प्रिमिअरमध्ये सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांची धमाकेदार एण्ट्री झाली. किशोरी शहाणे, शिवानी सुर्वे, प्रेक्षकांची लाडकी राधा म्हणजेच वीणा जगताप, सुरेखा पुणेकर, वैशाली माडे यांचे एकापेक्षा एक दमदार परफॉर्मन्स सादर झाले.
किशोरी शहाणे यांची बिग बॉसच्या घरात पहिली एण्ट्री झाली आणि त्यानंतर एक एकजण असे १४ सदस्य घरात दाखल झाले. बिग बॉसचं आलिशान घर पाहून सर्व सदस्य अवाक् झाले.
#BiggBossMarathi2 च्या घरातला आज पहिला दिवस. मग या दिवसाची सुरूवात एका रॅपचिक गाण्याने झालीच पाहिजे नाही का? पाहा आजरात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर आणि @justvoot वर कधीही. #NehaShitole @GmKishori #ShivThakare @imsurveshivani @vaishalimhade #SurekhaPunekar pic.twitter.com/Ci876tfC3o
— Colors Marathi (@ColorsMarathi) May 27, 2019
शिवानी सुर्वेवर म्हटलेलं गाणं असो, घरात झालेला वाद असो किंवा घरातील पहिली नॉमिनेशन प्रक्रिया असो, पहिल्याच दिवशी कवी मनाचे नेते अभिजीत बिचुकले चर्चेत राहिले. शिवानी सुर्वे आणि शिव ठाकरे यांच्यात एण्ट्री होताच वाद का झाला, पुढे काय झालं हे येत्या भागात स्पष्ट होणार आहे. पहिल्या नॉमिनेशन प्रक्रियेत कोण नॉमिनेट होणार हेसुद्धा पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.