News Flash

Bigg Boss Marathi 2 : नेहाच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन

हे सरप्राईज पाहून नेहा प्रचंड भावूक झाली

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय कार्यक्रम बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. घरात रंगणारे वेगवेगळे टास्क, सदस्यांमध्ये रंगणाऱ्या गप्पा आणि त्यांच्यातील वाद या साऱ्यामुळे शोची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. घरामधील काही सदस्य असे आहेत जे सतत या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यातीलच एक सदस्य म्हणजे नेहा शितोळे. नेहा कायम तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत येत असते. मात्र यावेळी नेहा वेगळ्या कारण्यासाठी चर्चेत आली आहे.

घरामध्ये कायम एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे सदस्यांनी घरामध्ये नेहाच्या वाढदिवसासाठी एकत्र आले आणि त्यांनी नेहाला सुंदर असं सरप्राईज दिलं. घरामध्ये बाहेरच्या वस्तू आणण्यास परवानगी नाही. मात्र सदस्यांनी घरातील वस्तूंच्या मदतीनेच नेहाला मस्त सरप्राईज दिलं.

शिव, हिना, अभिजित केळकर, वैशाली आणि सुरेखा ताई यांनी मिळून तिला सुंदर सरप्राईझ दिलं. घरामध्ये केक आणू शकत नसल्याने त्यांनी कलिंगडलाच केक तयार केला आणि HBD असा मेसेज लिहून रात्री तिला सरप्राईज दिलं. नेहाला बिग बॉसच्या घरामध्ये तिच्या नवऱ्याने छानसा बुके, केक पाठविला. हे सरप्राईज पाहून नेहा प्रचंड भावूक झाली. याचबरोबर वैशालीने सुंदर गाणे देखील म्हटले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2019 5:54 pm

Web Title: bigg boss marathi 2 neha shitolle birthday celebration ssj93
Next Stories
1 अखेर परागने दिली रूपालीप्रती आपल्‍या प्रेमाची कबुली
2 ..तर मलायका-अरबाज येणार एकत्र?
3 Video : ‘KGF’ स्टार यश पुन्हा एकदा होणार बाबा
Just Now!
X