News Flash

Bigg Boss Marathi 2 : पराग कान्हेरेचा घरातील ‘या’ सदस्याला पाठिंबा

त्याने या सदस्याला वोट करण्याचं आवाहन केलं आहे

पराग कान्हेरे

‘बिग बॉस मराठी’च्या घरातून बाहेर पडलेला स्पर्धक पराग कान्हेरे या घरातून जरी बाहेर गेला असला तरी चाहत्यांमध्ये त्याची बरीच चर्चा आहे. पराग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असतो. त्यामुळे बिग बॉसच्या घरात ज्या काही गोष्टी घडतात त्यावर तो कायम त्याचं मत व्यक्त करत असतो. त्यातच आता त्याने फेसबुकच्या माध्यमातून घरातील एका सदस्याला पाठिंबा दिला आहे. त्यासोबतच त्याने या स्पर्धकाला भरभरुन मत देण्याचंही आवाहन केलं आहे.

‘बिग बॉस मराठी २’च्या घरामध्ये प्रवेश केल्यापासून प्रत्येक गोष्टीला शांत आणि सामंजस्याने सामोऱ्या जाणाऱ्या किशोरी शहाणे यांचा चाहतावर्ग अफाट आहे. या वयामध्येही तरुणांना लाजवेल अशा ताकदीने टास्क खेळण्याची त्यांची पद्धत चाहत्यांना आवडत आहे. त्यामुळेच आतापर्यंत अनेक वेळा नॉमिनेशन प्रक्रियेला सामोऱ्या गेलेल्या किशोरींना चाहत्यांनी वोट देऊन वाचवलं आहे. त्यातच आता त्यांच्या पाठिंब्यासाठी पराग कान्हेरेदेखील सज्ज झाला आहे.

वाचा : असं घडलं किशोरी शहाणेंचं करिअर!

पराग कान्हेरेने फेसबुकच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर करत किशोरी शहाणे यांना पाठिंबा दिला आहे. त्यासोबतच त्याने किशोरींना वोट करण्याचं आवाहन केलं आहे. त्याच्या या पोस्टवरुन त्याने उघडपणे किशोरींना पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसापूर्वी परागने ‘तिकीट टू फिनाले’ या टास्कवर संताप व्यक्त केला होता. ‘माझा बॉल, माझी बॅट, माझा स्टंप.. किमान थर्ड अंपायर म्हणून तरी प्रेक्षकांना खेळात सहभागी होऊ द्या (लाजेखातर).’ या मूर्खपणात मी सहभागी नसल्याचा मला आनंद आहे, असं त्याने इन्स्टाग्रामवर म्हटलं होतं.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 23, 2019 2:16 pm

Web Title: bigg boss marathi 2 parag kanhere support kishori shahane ssj 93
Next Stories
1 पाकिस्तानला UN चा झटका : प्रियांका चोप्राचा व्यक्तिगत मत मांडण्याचा अधिकार अबाधित
2 बोनी कपूर यांचा ‘श्रीदेवी बंगलो’ चित्रपटाच्या शिर्षकावर आक्षेप
3 बालाकोट हवाई हल्ल्याची शौर्यकथा लवकरच रुपेरी पडद्यावर
Just Now!
X