‘बिग बॉस मराठी २’च्या घरात रंजकपणे टास्क रंगत आहेत. स्पर्धकांनी आता गटबाजी करण्यास सुरूवात केली आहे. या सिझनच्या पहिल्या टास्कसाठी घरातील सदस्यांना दोन संघांमध्ये विभागण्यात आलं. यापैकी एका टीमचे नेतृत्व अभिजीत बिचुकले तर दुसऱ्या टीमचे नेतृत्व वैशाली माडेकडे सोपवण्यात आलं. ‘अनसीन अनदेखा’ व्हिडिओमध्ये पराग कान्‍हेरे व माधव देवचके हे किशोरी शहाणे विज, अभिजीत केळकर, विद्याधर जोशी आणि सुरेखा पुणेकर यांनी सादर केलेल्‍या क्रॉस-ड्रेसिंग टास्‍कबाबत चर्चा करताना दिसले.

सुरेखा यांना विद्याधर जोशींच्या रुपात घरात वावरायला सांगितलं होतं. ‘मला त्यांची काळजी आहे. ही लोकं कलावंत आहेत,’ असं म्हणत पराग सुरेखा यांची बाजू घेतो. ‘माझी काही नितीमूल्ये आहेत आणि ती मी जपली,’ असंही तो पुढे म्हणतो. तर बिचुकले या मतांना मान डोलावत होकार दर्शवतो. माधव देवचकेसुद्धा परागच्या मताने प्रभावित होतो.

वाचा : ‘आशिकी’च्या प्रदर्शनापूर्वी महेश भट्ट यांनी लिहून दिलं, ‘मी दिग्दर्शन सोडून देईन’

दुसरीकडे बिग बॉसच्या घरात सुरेल अंताक्षरी रंगली. ज्यामध्ये अभिजीत केळकरने खूप छान गाणी सादर केली. वैशालीचा मधूर आवाज बऱ्याचदा घरात ऐकू येतो. घरातील पहिलं एलिमिनीशेन पार पडणार आहे आणि पहिल्यांदा घरातून कोण बाहेर पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.