News Flash

Bigg Boss 2 : या आठवड्यात घरातल्या सदस्यांसमोर असेल ‘हा’ नवा टास्क

या टास्कमध्ये घरातील काही जण नॉमिनेट होण्याची शक्यता

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. नुकतंच या घरातील सदस्यांना घरात प्रवेश करुन १ आठवडा पूर्ण झाला आहे. त्यातच शनिवार आणि रविवारी WEEKEND डावदेखील रंगला. या डावामध्ये महेश मांजरेकरांनी घरातल्या सदस्यांना त्यांच्या चुका दाखविल्या, त्यासोबतच योग्य ठिकाणी त्यांचे कौतुकही केली. यामध्येच आता बिग बॉसच्या घरातील दुसऱ्या आठवड्याला सुरुवात होणार आहे. या दुसऱ्या आठवड्यामध्ये नवा टास्क घरातल्या सदस्यांना खेळावा लागणार आहे.

घरामध्ये शिव ठाकरे याला पहिला कॅप्टन होण्याचा मान मिळाला आहे. त्यामुळे आता दुसऱ्या टास्क शिवच्या देखरेखी खाली होईल असं म्हणायला हरकत नाही. विशेष म्हणजे पहिल्या टास्कप्रमाणेच यावेळचा टास्कही तितकाच रंजक असणार आहे. या टास्कचं नाव ‘पोपटाचा पिंजरा’ असं असून या टास्कमध्ये नक्की काय होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

या टास्कमध्ये बिग बॉस घरात नको असलेल्या सदस्यांना नॉमिनेट करण्याची संधी इतर सदस्यांना मिळणार आहे. ही संधी एका पक्षात दडलेली आहे. प्रत्येक टीमकडे विरुध्द टीमच्या सदस्यांचे पक्षी असणार आहेत. प्रत्येक बझरनंतर सदस्यांना विरुध्द टीमच्या सदस्याचा पक्षी पिंजऱ्यात बंदिस्त करायचा आहे म्हणजेच विरुध्द टीमच्या सदस्याला नॉमिनेट करायचे आहे . यावरून नेहा आणि शिवमध्ये वाद झालेला बघायला मिळणार आहे. आता कोण बरोबर नेहा कि शिव हे आजच्या भागामध्ये कळेलच.तेव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी पर्व २ आज रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2019 1:53 pm

Web Title: bigg boss marathi 2 second task poptacha pinjara
Next Stories
1 ‘या’ कारणासाठी शाहरुखने मानले करण, आदित्य चोप्राचे आभार
2 ‘शिवाजी महाराजांचा जन्म शूद्र जातीत’; बॉलिवूड अभिनेत्रीचं वादग्रस्त ट्विट
3 ..तर अर्जुन कपूर झाला असता ‘कबीर सिंग’
Just Now!
X