बिग बॉस मराठीच्या घरात आता वेगवेगळे गट तयार झाले आहेत. किशोरी, पराग, रुपाली, वीणा यांच्या गटात आता शिवसुद्धा सामील झाला आहे. घरातील सदस्य एकमेकांच्या मागे बोलतच असतात. या गोष्टी कधी इतर सदस्यांपासून लपतात तर कधी त्या समोर येतात. पण जेव्हा त्या व्यक्तीसमोर त्याच्या मागे बोलणाऱ्या गोष्टी कळतात, तेव्हा काय होतं? असंच काहीसं शिव आणि अभिजीत केळकर यांच्यात घडलं आहे.
माधव शिवबद्दल जे काही बोलला ते शिवला समजले आहे. त्यावरूनच आता शिव आणि माधव यांच्यात वाद होणार आहे. माधवने अभिजीतला सांगितले की, शिववर विश्वास ठेवू नकोस आणि शिवला याउलट सांगितले की तू अभिजीतवर विश्वास ठेवू नकोस. या गोष्टीचा समोरासमोरच सोक्षमोक्ष लागावा म्हणून शिवने अभिजीतला सोबत घेऊन माधवला जाब विचारला.
#BiggBossMarathi2 च्या घरात स्पर्धकांचं डबलढोलकी वागणं आता एकमेकांसमोर येऊ लागलंय. यावरूनच नेमका काय वाद पेटला शिव आणि माधवमध्ये पाहा आज रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर.@ShitoleNeha @GmKishori @shiv_Thakare @imsurveshivani @vaishalimhade @PunekarSurekha @officialveenie pic.twitter.com/TzubWGobrt
— Colors Marathi (@ColorsMarathi) June 10, 2019
या वादावर आता माधव काय सांगणार, तो शिव आणि अभिजीतसमोर त्याची बाजू कशी मांडेल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.